महिलेच्या घरातून दोन तलवारीसह एक चॉपर जप्त मध्यवर्ती गुन्हेशाखा नाशिक शहरची कामगिरी

 नाशिक (प्रतिनिधी):-  शहरात अवैधरित्या येत असलेले घातक शस्त्र रोखण्याचे पोलिसांसमोर आवाहन ठरले असतानाच विहितगाव येथे एका महिलेच्या घरातून दोन तलवारीसह चॉपर सापडल्याने पुन्हा एकदा घातक शस्त्राचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारचे शस्त्र सापडत असल्याने पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस यंत्रणेला संबंधितांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्त  विश्‍वास नांगरे पाटील यांनी विधानसभा निवडणूक आचार संहिते दरम्यान गोपनिय माहीती काढुन अवैध शस्त्र बाळगणे , अवैध व्यवसाय करणार्‍या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयुक्तांचे आदेश पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीही मनावर घेतले असून, याबाबत ठिकठिकाणी हत्यारांचा शोध सुरू आहे. शुक्रवार दि. २७ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू केला. विहीतगांव संगमनेरे यांच्या विटभट्टी जवळ राहणारी महिला गौरी चव्हाण हिने तिच्या घरात ३ ते ४ तलवारी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गौरी चव्हाण हिच्या  घरी छापा मारला असता  कारवाईत  तिच्या घरी  दोन तलवारी व एक चॉपर असे मनाई करण्यात आलेली शस्त्रे सापडली.
या शस्त्रांबाबत गौरी सांडू चव्हाण रा . संगमनेरे यांची खोली यांच्याकडे चौकशी केली असता त्या राहत असलेल्या  वालदेवीनगर विहीतगांव , नाशिकरोड येथील खोलीत काहीही नसल्याचे प्रथम त्यांनी सांगितले. त्यानंतर चौकशीअंती तिच्या खोलीची झडती घेतली असता तलवारी व चॉपर आढळून आले. सदर महिलेविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि . नं ५५७ / २०१९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ /२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला.
 सदरची कारवाई  पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील , पोलीस उपायुक्त ,गुन्हे  लक्ष्मीकांत पाटील, सहा . पोलीस आयुक्त ( गुन्हे ) आर . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . सिताराम कोल्हे , पोलीस निरीक्षक सुनिल रोहोकले , सपोनि धर्मराज बांगर , पोउनि महेश शिंदे , पोहवा  दिलीप ढुमणे , पोना  संजय गामणे , पोना संदीप पवार , पोशि अनिल शिंदे , मपोना  निलीमा निकम यांच्या पथकाने केली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे , नाशिक शहर करित आहेत.
निवडणुकीच्या काळात शस्त्रांना बंदी असतानाही ठिकठिकाणी छाप्यामध्ये गावठी कट्ट्ट्यांसह या प्रकारचे तलवारी चाकू, चॉपर यासारखे घातक शस्त्र आढळून येत आहे. ही शस्त्रे सिमावर्ती भागातून कोठून येतात? याबाबतचा तपासही पोलिसांनी लावला असून, लवकरच सदर ठिकाणी पथक जावून कारवाई होणार आहे. मात्र शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही शस्त्रे येत असल्यामुळे पोलिसांपुढे हे आव्हान उभे आहे

संबंधित पोस्ट