पंतप्रधानांसाठी ३०० फुटांची राखी
घर वाचवण्यासाठी रहिवाशांनी पाठवली रक्षाबंधनाची विशेष भेट
- by Reporter
- Aug 19, 2024
- 470 views
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोक वेगवेगळ्या प्रसंगी नाना तऱ्हेचे वस्तू भेट म्हणून देत असतात परंतु आज पर्यंत नरेंद्र मोदी यांना कोणी घर वाचवण्यासाठी भेट वस्तू दिल्याचे तुम्ही ऐकल किंवा पाहिले नसेल पण अशीच एक आगळी वेगळी भेटवस्तू मुंबईतील एलआयसी इमारतीत राहणारे रहिवाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास रक्षाबंधनाची भेट म्हणून दिली आहे. ही भेट वस्तू म्हणजे चक्क ३०० फुटांची भव्य दिव्य राखी आहे. आणि या राखीचे निर्माण मुंबईतील एलआयसी इमारतीत राहणाऱ्या महिलानी स्वतःच्या हाताने व कल्पक बुद्धीचा वापर करून ही राखी तयार केली आहे. तीनशे फुटांची ही राखी आमदार व पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना ऑगस्ट क्रांती मैदानात सुपूर्द करण्यात येणार होती.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना विशाल राखी सुपूर्द करण्यासाठी एलआयसी भाडेकरू संघात कार्यरत असणाऱ्या ३०० हून जास्त महिला ऑगस्ट क्रांती मैदानात उपस्थित होत्या. ह्यावेळी स्वतः मेहनत घेऊन तयार केलेली राखी नरेंद्र मोदी यांना भेट पाठवून या महिला मुंबईतील राहती घरे एलआयसीच्या हातून वाचवण्याची विनंती करणार आहेत. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० त्ते ११ या वेळेत ऑगस्ट क्रांती मैदानावर ही भव्यदिव्य राखी सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आली होती.
मुंबई परिसरातील एलआयसी इमारतींना जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. एलआयसी इमारतीत राहणारे २५०० कुटुंबे ५ दशकांहून अधिक काळ त्रास सहन करत आहेत. एलआयसी ने गेल्या २० वर्षात अनेक रहिवाशांना बेदखल केले आहे. रहिवाशांना वेगवेगळे भाडे आकारली आहेत. एकतर रहिवाशांना उत्पन्ना पेक्षा दुप्पट असणारे जबरदस्त भाडे द्यावे लागते किंवा त्यांना आपली राहती घरे रिकामी करावी लागतात. असा आरोप एलआयसी भाडेकरू संघाने केला आहे.
एलआयसीच्या इमारती जवळपास १०० वर्षे जुन्या झाल्या आहेत ज्यांना तातडीने पुनर्विकासाची गरज आहे परंतु एलआयसी पुनर्विकासाच्या बाजूने तयार नाही. या धोकादायक इमारतींमध्ये हलाखीचे जीवन जगण्याशिवाय रहिवाशांना पर्याय उरलेला नाही. त्यासाठी १२ ऑगस्ट रोजी एलआयसी इमारतीत राहणाऱ्या भाडेकरून साठी लढणाऱ्या भाडेकरू संघाने मोर्चा काढून आजद मैदान येथे एलआयसी विरोधात धरणे आंदोलन केले होते आंदोलनात ५०० हून अधिक रहिवासी हातात बॅनर घेऊन जोरजोराने घोषणा देत निषेध व्यक्त करत होते.
रिपोर्टर