मुंबादेवीत शिवसेना शिंदे गटाकडून लोकाभिमुख कार्यचा धडाका

वर्धापन दिन, धर्मवीर आनंद दिघे कक्ष उद्घाटनासह विविध उपक्रमांना मान्यवरांची उपस्थिती

मुंबादेवीत शिवसेना शिंदे गट आणि प्रस्थापित काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये येत्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे ह्या सीटवर काँग्रेसने हक्क दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून ह्या सीटवर हक्क जमवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे.येत्या निवडणुकीत ह्या सीट साठी दोन पक्षांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.


मुंबई : मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लोकाभिमुख कार्यक्रमांचे जोरदार आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी मुंबादेवी मध्यवर्ती कार्यालयाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा,धर्मवीर आनंद दिघे कक्ष उद्घाटन, “शासन आपल्या दारी” उपक्रम,२०२६ दिनदर्शिका वाटप,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नूतनीकरण,तसेच पाण्याच्या मोटर व दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअर वाटप असे लोकाभिमुख कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. एका मागून एक असे पंचवीस तीस कार्यक्रम शिवसेना शिंदे गटातर्फे घेण्यात आल्याने विरोधकांमध्ये छातीत धडकी भरली आहे.

या भव्य कार्यक्रमास शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेते सुनील नरसाळे,शिवसेना प्रवक्त्या अ‍ॅड. सुशीबेन शहा,महिला विभागप्रमुख रेखा सुरणकर, माजी विभागप्रमुख दिलीप नाईक, सहकार सेना मुंबई अध्यक्ष रेखा मोरे, युवासेनेच्या रुची वाडकर, तसेच महायुतीतील विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणारे हे सर्व उपक्रम सेवा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरले.या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुंबादेवी विधानसभा विभाग प्रमुख रुपेश रमेश पाटील आणि उपविभाग प्रमुख सौ. प्रिया रुपेश पाटील यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले,अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.मुंबादेवी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव जनतेच्या सोबत उभी आहे, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

शाखा क्रमांक २२३ साठी मुंबादेवीचे विभाग प्रमुख रुपेश पाटील ह्यांनी संपूर्ण वॉर्डत अनेक उद्घाटन केली व शेवटचा कार्यक्रमात दिव्यांगांना व्हील चेअर, वॉकर , ज्येष्ठांना स्टीलच्या काट्यांचे वाटप केले.इथल्या ४२ इमारतींना रुपेशने पाण्याचे पंप दिले आता निवडणूकत आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यायचा आहे. तो म्हणजे धनुष्य बाण बाळासाहेबांचा, शिंदे साहेबांचा आणि प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण कारण हा धनुष्यबाण तुमच्या हाकेला धाऊन येणार आहे. हेवी दावे बाजूला ठेवा आणि माणुसकीने वागणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असे म्हणत मीनाताई कांबळी ह्यांनी आले मत व्यक्त केलं

संबंधित पोस्ट