वच्छी हीं व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने जगले -----संजीवनी पाटील

झी मराठी वाहिनीवर नित्य नियमाने लागणारी.. रहस्यमय अशी लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले पार्ट २ यांमधील वच्छी ही खलनायकी भूमिका सहजतेने साकारणारी तुमच्या आमच्यातली एक घरंदाज स्त्री... आपल्य़ा लहान वयात देखील मोठ्या सासूची भूमिका सहजपणे पेलावणारी अभिनेत्री संजीवनी पाटील.  

तेव्हा आपण जाणून घेऊया त्यांचे मनोगत त्यांच्याच लेखणीतून....!

वयाने लहान आणि भूमिका मात्रं मोठी कारण वच्छीची भूमिका पेलावणे हे खुप मोठं आव्हान होतं कारण या मालिकेतील जाऊबाई म्हणजे माई तुझ्या आईच्या वयाच्या आहेत़ असे सर्वजण मला कौतुकाने बोलायचे. जेव्हा पहिल्या दिवशी मी रात्रीस च्या सेटवर गेले तेव्हा मी खुप घाबरले होते. कारण त्यावेळी मी नवखी असल्यामुळे सर्वजण मला सिनियर होते. काही वेगवेगळ्या अभिनय स्कूल मधून शिकून आलेले होते तर काहीं शिबिर मधून 

तर कुणी युनिव्हर्सिटी मधून आपलं नशीब आजमावयाला आलेले होते. अशा मधून आपला निभाव कसा लागेल या विवंचनेत मी होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या विचारधारेची जरी असली तरी मी एक गृहिणी म्हणूनच कुटूंबात वावरत होती. आणि अभिनयाची आवड नसानसात भिनल्यामुळे माझी हीं आवड थेट शाळा कॉलेज मध्ये येऊन पोहोचली.. मग त्यातून काही छोट्या-मोठ्या भूमिका साकारून मन रमवू लागले. वयाच्या १८ व्या वर्षी संतोष पाटील यां पोलिसी खाकी बरोबर लग्न झाल्यामुळे अंगी शिस्त.. संयम त्याचबरोबर वैवाहिक जीवनाची जबाबदारी सुद्धा फार लवकर अनुभवायला मिळाली त्यांत सासरे यांना अर्धाँगवायु झाल्यामुळे अभिनयाला पुरेसा वेळ मिळेनासा झाला. पण अभिनयाची आवड स्वस्थ बसू देईना कारण त्यावेळी कामगार कल्याण राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, इतर संस्थांच्या राज्य नाट्य स्पर्धा त्याचप्रमाणे इतर छोट्या मोठ्या स्पर्धांत मला अभिनयाची संधी मिळत गेली. आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे मी सोने करीत गेले. पण इतका अनुभव गाठीशी असताना सुद्धा मला हवा तसा प्लँटफॉर्म मिळाला नव्हता. असं एकंदरीत चाललं असताना मला कुणीतरी सांगितलं की तुझ्यात इतकं कला कौशल्य आहे, तु चांगल्या प्रकारे अभिनय करू शकतेस.. मग एखादी ऑडिशन कां नाही देत... कारण त्यावेळी बऱ्याच सिनेमाच्या, मालिकेच्या, जाहिरातीच्या ऑडिशन घेतल्या जायच्या आणि सध्या ऑडिशन हे एक प्रकारचे समीकरण बनलं होतं. मग काय ठरलं..! आपण ऑडिशन द्यायची.. आणि मग खऱ्या अर्थाने माझा स्ट्रगल पिरीयड सुरू झाला. एकीकडे प्रपंच तर दुसरीकडे अभिनय याचा समतोल राखणे डोईजड होऊ लागलं.. पण आवड असेल तर सवड मिळतेच आणि या सवडीने जन्म घेतला तो रात्रीस खेळ चाले पार्ट २ मधील वच्छी या खलनायकी भूमिकेचा. सुनिल भोसले आणि त्यांच्या टीम कडुन मला वच्छी यां व्यक्तिरेखासाठी विचारण्यात आले. मालिका ही मालवणी भाषेतील असल्यामुळे आणि मी कोकणस्थ म्हणजे वैभववाडी तालुक्यांतील कुसूर यां गावची असल्यामुळे मला मालवणी भाषा बऱ्यापैकी अवगत होती. तेव्हा वच्छी हीं केवळ भूमिका नसून ते माझ्यासाठी आव्हान होते. हे आव्हान मी स्वीकारले...

पाय जमिनीवर पण मनातील झालेला आनंद मात्रं गगनात मावेनासा झाला. कारण मी वच्छी ही भूमिका जगले. या भूमिकेने केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मला मान.. सन्मान.. प्रतिष्ठा.. ओळख.. सर्व काहीं दिलं... रसिक मायबाप वच्छी म्हणुनच मला जास्त ओळखू लागले. याचे सर्व श्रेय सुनिल भोसले आणि आणि त्यांच्या टीमला देते. त्याचबरोबर मी रसिक मायबाप प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार मानते कारण त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच मी आज लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाले. आणि त्याचं फलित म्हणुन मला झी मराठी चा २०१९ चा उत्कृष्ठ खलनायीका म्हणुन अवार्ड जाहीर झाला. खरंच झी मराठी आणि त्यांच्या सर्व टीमला आणि रात्रीस खेळ चाले मधिल सर्व कलाकार, तंत्रज्ञ आदी सर्व कलाप्रेमी रसिक यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो कारण त्यांनी माझ्यावर जों विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा न देता मी माझी भूमिका समरसपणे पार पाडू शकलो याचा मला आनंद तर आहेच शिवाय सार्थ अभिमान देखील आहे. 

गेले आठ महीने मुंबईतच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आणि देशांत कोरोनाच्या भीतीने आणि सततच्या लॉक डाऊन मुळे

सर्व कलाकारांवर दुःखाचं सावट पसरलं आहे. अद्यापही जनता यांतून सावरलेली नाही. मित्रांनो मी सुद्धा तुमच्यातलीच एक भारतीय नारी आहे. मला सुद्धा मन.. भावना आहेत़.. लॉकडाऊन काळात उद्भवलेल्या परिस्थितीची झळ सर्व सामान्य ते उच्चभ्रू जनतेपर्यंत पोहोचली आहे. त्यापेक्षाही जास्त कलाकार वर्गाला पोहोचली आहे. आज कलावंत खऱ्या अर्थानें उपेक्षित झाला आहे. खरोखरंच कला या शब्दांत किती वजन आहे त्याची आपण तुलनाच करू शकत नाही कारण कला हीं अशी गोष्टं आहे की ती मनुष्यप्राण्याला इतर प्राणिजीवांपासून वेगळं करते, त्याची उन्नती करते. कलेची व्याख्या करणे अवघड आहे. तेव्हा याच कलेच्या जोरावर... सामर्थ्यावर... मला पुन्हा विराजमान व्हायचं आहे.. आतापर्यंत तुम्ही मला वच्ची च्या भूमिकेत पाहिलं..माझ्या अभिनयाची प्रशंसा केलीत मला नवीन ओळख दिलीत तेव्हा या दीपावली च्या मुहूर्तावर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मला तुमच्यासमोर यायचं आहे जसं प्रेम तुम्ही वच्छीला दिलंत तसंच प्रेम तुम्ही माझ्या पुढील भूमिकेला नक्की द्याल अशी नटेश्वरचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे माझ्या लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षकांना हीं दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना....करते...!

सौ.संजीवनी संतोष पाटील

जी/७५, वरळी पोलिस कँम्प, सरपोचखानवाला रोड, हिलटॉप हॉटेलजवळ, वरळी, मुंबई ४०० ०३०

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट