धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून तरुणाचा मृत्यू
मृत्यूला कारणीभूत दुय्यम अभियंता स्वप्निल सानफ चे निलंबन करा
- by Reporter
- Dec 12, 2025
- 100 views
- - दोन जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
महापालिका बी विभागात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सानफ च्या आशीर्वादाने सुरू आहेत बेजबाबदार दुय्यम अभियंता स्वप्निल सानफ या मृत्यूला जवाबदार असून गुन्हा नोंद करून निलंबित करा !
मुंबई : मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पश्चिमेला कोटक भवन, नरसी नाथा स्ट्रीट, येथील इमारतीचा स्लॅब कोसळून एका २८ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोटक भवन नरशी नाथा स्ट्रीट या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली असलेल्या चहाच्या टपरीवर कोसळला. यावेळी टपरीवर चहा मालक व चहा पिण्यासाठी दोन ग्राहक उभे होते. हा स्लॅब थेट त्यांच्यावर कोसळल्यामुळे दुकान मालक मुकेश देंडोर, वय २८ याचा जागीच मृत्यू झाला. तर शफीक इस्लाम, वय ४०, व शालिकराम जयस्वाल, वय ५२ हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
या दुर्घटनेनंतर सुरुवातीला इमारत कोसळल्याची अफवा पसरल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरवरा पळू लागले. स्लॅप पडल्याची घटना अग्निशामक दलाला कळतात अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दल दाखल झाले. सावधगिरीची उपायोजना म्हणून स्लॅब पडलेल्या सदनिकातील नागरिकांसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात आले. इमारत ६० ते ७० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते, असे समजते. पोलीस व अग्निशमन दल पुढील तपास करीत आहेत.

रिपोर्टर