ग्रांटरोड च्या हाकिम चाळीतील रहिवाशी मृत्युच्या छायेत; मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे खा.अरविंद सावंत,आमदार अमिन पटेल,स्थानिक नगरसेवक यांना आमच्या जीवाची काळजी का नाही?- रहिवाश्यांचा संतप्त सवाल

मुंबई: दक्षिण मुंबई लोकसभा तसेच मुंबादेवी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या ग्रँट रोड येथील पठ्ठे बाबूराव मार्ग वरील हकिम चाळ बिल्डींग मध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव इमारत धोकादायक झाल्यामुळे धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे या या इमारतीत राहणारे कुटुंबीय अन्य काहीच पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालून येथे राहत आहेत. ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यामुळे कोसळल्यास येथे मोठी जीवित हानी होण्याचे संकट उभे राहिले आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलीस म्हाडा अधिकारी त्याचप्रमाणे इमारत मालक यांच्याशी संपर्क साधून विशेष काहीच घडत नसल्याने तेथेच राहण्याचा धोका पत्करलेला आहे. या संदर्भात माहिती मिळताच दैनिक आदर्श महाराष्ट्र टीमने येथे भेट देऊन पाहणी केली असता रहिवाशी जीव धोक्यात घालून कसे राहात आहेत हे पाहिले. अत्यंत घरांची अत्यंत दयनीय स्थिती असून घर मालक या सर्वांना वेठीस धरीत आहे हे स्पष्ट झाले.घर मालकाने येथील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळविले असून प्रात विधीसाठी,शरीर धर्मासाठी असलेले संडास बाथरूम शनिवार रविवार पाहून उध्वस्त केले आहे.तळाला राहणाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एक संडास बांधून दिलेला आहे एक विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना कोणतीही पूर्वसूचना कल्पना न देता संडास तोडून टाकण्यात आले. त्याच प्रमाणे लोखंडी जाळ्या लावून जनावरे आत येऊ नयेत म्हणून अटकाव करतात असा बंदिस्त पिंजरासम प्रकार केलेला आहे.येथील एका कुटुंबातील मुलींना अत्यंत त्रास दायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे,तो म्हणजे संडासची सोय उपलब्ध नसल्याने लांब ठिकाणी असलेल्या शौचालया चा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे शाळेचे खाडे होत असून शालेय जीवनाचे नुकसान होत आहे. येथील परिस्थिती अत्यंत भयावह असून एखादी इमारत पडण्यासारखी दुर्घटना केव्हाही घडू शकते.

लोकांची फसवणूक करणाऱ्या इमारत मालक एन.एच.हरसोरा वर कारवाई करा -रहिवाश्यांची मागणी

मुजोर मालक गेली १० वर्षे इमारत दुरुस्तीच्या नावाखाली रहिवाश्यांची फसवणूक करीत आहे.
मालक एन.एस.हरोसा यांनी रहिवाश्यांविरोधात स्वतःच्या फायद्यासाठी मोठे षडयंत्र रचले आहे. लोकांना त्रास द्यायचा म्हणजे ते निघून जातील. त्या जागेची किंमत उद्या एक कोटी  ते पाच कोटी पर्यंत जाणार आहे. लोकांना त्रास दिला की ते कवडीमोल भावात घर विकून जातात. मग त्या जागेत टोलेजंग इमारत तयार केली जाते. यात म्हाडा अधिकारी, पोलीस, राजकारणी या सगळ्यांचेच हितसंबंध असल्यामुळे पीडित रहिवाश्यांना कोणी वाले राहत नाही.
इमारतीचा मालक एन.एस.हरोसा यांनी तर कहरच केलेला असून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांनी सरोसा प्रायव्हेट लिमिटेड आणि पालक इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्र दिले असून त्या पत्राला आमदार डॉ. अशिष देशमुख यांचा संदर्भ आहे. आ.देशमुख यांनी रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठे प्रयत्न केले.परंतु त्यालाही या मुजोर मालकाने काहीच किंमत दिली नाही.असे मालकाच्या करणीमुळे सिद्ध होते आहे.

 काय आहे म्हाडाच्या पत्रात
म्हाडाने दिलेल्या पत्रात सदर संदर्भ दिलेला असून आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचे तसेच राज्यमंत्री गृहनिर्माण उच्च व तंत्रशिक्षण यांचाही यात उल्लेख आहे. हे पत्र मुख्य अधिकारी दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ यांना उद्देशून त्यांनी लिहिलेलेआहे.हेच पत्र या संदर्भातील आहे या पत्रात दिलेल्या माहितीनुसार मालमत्तेच्या पुनर्विकासासाठी मंडळाकडून विकास नियंत्रण नियमावली ते 33 (7) दि.25/1/1999  मधील तरतुदीनुसार अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक 2.50 नुसार दि.26/3/2010 रोजी आपणास (म्हणजे भरोसा प्रायव्हेट लिमिटेड आणि पालक इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना उद्देशून म्हटले आहे की) आपणास ना-हरकत प्रदान करण्यात आले आहे. तदनंतर मंडळाकडून चटईक्षेत्र निर्देशांक 3.00 प्रमाणे आपणास 24/7/2012 रोजी ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. ना हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तीनुसार इमारत पुनर्विकास करिता करेपर्यंत इमारत वास्तव्याच्या दृष्टिकोनातून सुस्थितीत ठेवणे ही ना हरकत प्रमाणपत्र धारकांची जबाबदारी आहे
. गौतम रामजी साळवे यांच्या खोलीची अवस्था दयनिय असल्याचे आमदार आशिष देशमुख यांनी नमूद केले असून गौतम रामजी साळवे यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे प्रतिपादन केले आहे. जुलै 2012 मध्ये सुधारित ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरही आपण अद्याप पुनर्विकासाचे काम सुरू केलेले नाही.जुन्या उपकरप्राप्त इमारतीची स्थिती लक्षात घेता, इमारतींची दुरुस्ती तातडीने करण्याबाबत आपणास यापूर्वी वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे.या प्रकरणी आपणास पुनश्च कळविण्यात येते, की तातडीने खोलीची व इमारतीची आवश्यक त्या इतर भागाची दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून सरत्या पावसात कोणतीही दुर्घटना घडणार नाही.साळवे व इतर भाडेकरू रहिवाशी ज्यांच्या खोल्यांची अवस्था खराब झालेली आहे.त्यांच्यासाठी पर्यायी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करून त्यांचे त्या ठिकाणी स्थलांतर करावे.
ईमारतीच्या पुनर्विकासाकरिता आपणास ना हरकत प्रमाणपत्र मंडळाकडून जारी करण्यात आलेले असल्यामुळे, इमारतीतील भाडेकरू रहिवाशी यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे इमारतीतील भाडेकरूच रहिवाशांना म्हाडाकडून संक्रमण शिबिरात गाळा देता येणार नाही याची नोंद घ्यावी.आवश्यक ती कारवाई ताबडतोब करावी व तसे या कार्यालयास 15 दिवसाच्या आत कळविणे अन्यथा आपणावर नियमा नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.याची कृपया नोंद घ्‍यावी. असे पत्र दिनकर जगदाळे मुख्य अधिकारी इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ मुंबई यांनी घर मालकाला दिलेले आहे.याची एक प्रत आमदार डॉ.अशिष देशमुख,गृहनिर्माण व तंत्रशिक्षण मंत्री यांचे खाजगी सचिव यांना,कार्यकारी अभियंता इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ डी २ यांना देण्यात आलेली आहे.

ना-हरकत प्रमाणपत्र म्हाडा कडून मिळूनही घरमालकाने काहीच दुरुस्ती न करता भाड़ेकरूना येथून पळवून कसे लावता येईल असेच पाहिले असा दावा रहिवाशयांनी केला आहे,कारण या मुजोर मालकाने भाड़ेकरूना इतका त्रास दिला की काही भाडेकरु कंटाळले त्यांनी आपल्या खोल्या स्वस्तात विकुन येथून निघुन गेले.अशाच प्रकारे उरलेल्या लोकांना घरांची विक्री करण्यास भाग पाडायचे आणि नंतर विकासाच्या नावाखाली टोलेजांग टॉवर बांधुन रुपये 2 ते 5 कोटीना विकायचे असा घाट मालकाने घातल्याचा उघड दावा रहिवाशयांनी केला आहे.

माजी आमदार अरविंद नेरकर यांनी या संदर्भात इमारतीतील रहिवाशयांची बाजू घेत म्हटले की, मला अस वाटत की हकीमी चाळ सेक्शन 33(7) नुसार विकास करण्याचे काम मालक करतोय. गेली दहा-बारा वर्षे काही होत नाहीये. त्यामुळे इमारची दुर्दशा झालेली आहे.या वर दोन पर्याय आहेत 1) इमारत नीट करुन घेणे,सुस्थितीत आणणे
2) मालक,पोलिस अधिकारी, म्हाडा आणि भाड़ेकरु यांची बैठक घेऊन टेंनंट ने जागा खाली केल्यास किती दिवसात इमारत बाँधणार ,महारेरा कायद्यानुसार सर्व व्हावे,मालकाने किती कालावधीत इमारत बाँधनार,भाड़े किती देणार,जागा किती देणार?बिल्डर कोण आहे? या सर्व गोष्टीची शहानिशा मी करुन घेईन जर चांगल्या प्रकारे मालकाने भाड़ेकरूना योग्यता नुसार दिले नाही आणि जर उद्या या इमारतीला धोका निर्माण झाला तर या सर्वाची जबाबदारी मालक,म्हाडा आणि पोलिसांची राहील.



 चोर सोडून संन्याशाला फाशी; पोलीस प्रशासनाचा गजब न्याय
  इमारतीची संपूर्ण जबाबदारी बिल्डरची असताना स्थानिक पोलिसांनी मात्र रहिवाश्याला नोटीस पाठवली आहे. रहिवाशी गौतम रामजी साळवे यांना भारतीय फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, सन १९७३  चे कलम १४९  प्रमाणे डी. बी.मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत बांगर यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. इमारतेची संपूर्ण जबाबदारी मालकावर असताना रहिवाशी गौतम साळवेना ही नोटीस पाठवणे म्हणजे  चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे. या प्रकरणात पोलिसांची आणि इमारत मालकाची मिलीभगत असल्याचा संशय रहिवाशी व्यक्त करीत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट