नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले.

खडसे समर्थकांच्या गाड्या सज्ज, बॅनवरुन कमळ हटवलं, मुंबईच्या दिशेने प्रवासाची तयारी

जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी करणार याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. अशा परिस्थिती तिकडे मुक्ताईनगरात तयारीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. 

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.

दोन दिवसात खडसे राष्ट्रवादीत?

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे  येत्या गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील,  खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

रक्षा खडसे भाजपमध्येच थांबण्याची चिन्हं

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

घटस्थापनेचा मुहूर्त टळला

यापूर्वी एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हा अंदाज फोल ठरला होता. यानंतर खडसे यांनी ‘प्रसारमाध्यमांनीच माझ्या प्रवेशाचा मुहूर्त काढला होता, तो चुकला’, असे म्हटले होते. तसेच मी अजून भाजपमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे भाजप सोडून जाणार नाहीत, असा दावा केला होता. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट