एलआयसीच्या दडपशाही विरोधात भाडेकरूंचा मोर्चा भाडेकरून विषयी समस्या जाणून घेण्यात सरकार उदासीन
- by Reporter
- Aug 12, 2024
- 251 views
जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असे ब्रीदवाक्य जपत लोकांना जीवन आरोग्य आणि मालमत्तेसाठी सर्वोत्तम संरक्षण पुरवणाऱ्या (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मनमानी कारभारा विरोधात एलआयसी इमारतीत राहणारे भाडोत्री आज दि १२ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढून जोरदार आंदोलन करणार आहेत.
मुंबई : शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ एलआयसी मालकीच्या विविध उपकर प्राप्त मालमत्तांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना या नात्या कारणाखाली एलआयसी आपल्या भाडेकरूंना घरातून बेदखल करत आहे व रहिवाशांना वेगवेगळे भाडे आकारून त्यांचा मानसिक छळ करत त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. एलआयसीचा ह्या कठोर धोरणा विरोधात सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी ५०० हून अधिक रहिवाशी आझाद मैदानावर मोर्चा काढत हातात बॅनर पकडून घोषणा देत एलआयसीच्या मनमानी कारभारा विरोधात जोरदार आंदोलन करणार आहेत.
एलआयसी मालकीच्या विविध उपकर प्रतप्त मालमत्तांमध्ये राहणारी सुमारे २५०० कुटुंबे ५ दशकांहून अधिक काळ एलआयसीच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करत आहेत. एलआयसी ने गेल्या २० वर्षात अनेक रहिवाशांना घरात न बेदखल व बेघर केल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे.एलआयसी मालकीच्या इमारतींमध्ये समानतेचा मूलभूत अधिकार प्रचलित नाही एलआयसी इमारतीत राहणाऱ्या वेगवेगळ्या रहिवाशांना वेगवेगळे भाडे आकारले जाते. रहिवाशांना एकतर त्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट असणारे जबरदस्त भाडे द्यावे लागते किंवा रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करावी लागतात असेही म्हटले आहे.
ह्या इमारती जवळपास १०० वर्षे जुन्या आहेत या सर्व इमारतीनचा तातडीने पुनर्विकास करणे गरजचे आहे परंतु LIC पुनर्विकासाच्या बाजूने तयार होत नाही. या धोकादायक इमारतींमध्ये हलाखीचे जीवन जगण्याशिवाय रहिवाशांकडे देखील पर्याय उरलेला नाही. त्याकरता एलआयसी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी लढणारी LTOWA एलटीओडब्ल्यूए ही संघटना LIC च्या मनमानी आणि दडपडपशाही विरोधात १२ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात सकाळी ११ ते ५ ह्या वेळेत जोरदार आंदोलन करणार आहेत.
एलआयसी मालकीच्या इमारतींमधील ५०० हून अधिक रहिवासी आझाद मैदानात हातात बॅनर पकडून जोरदार घोषणा देत निषेध करताना दिसणार आहेत.२५०० हून अधिक कुटुंबांना वाचविण्यात मदत करण्यासाठी त्यांनी सरकारला आव्हान केले आहे.
रिपोर्टर