मोठ्या उद्योगांसह फेरीवाले,दुकानदारांनाही कर्ज देणार; मोदी सरकारची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- Jun 01, 2020
- 2588 views
नवी दिल्ली, १ जून:- देशात कोरोनाचं संकट गहिरं होत जातंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रुतलेलं आर्थिक चक्र पुन्हा वर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, एमएसएमई मुळे आपला जीडीपी वाढत आहे. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी एमएसएमईचा मोठा हात आहे. त्यामुळे एमएसएमईसाठी पर्याप्त फंड देण्यात आला असून त्यांच्यासाठी विविध योजनाही राबवण्यात आल्या आहेत. तसेच, लघु आणि मध्यम उद्योगही शेअर बाजारात सूचीबद्ध असणार आहेत.एमएसएमईमध्ये नव्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणार आहेत. एमएसएमईची मर्यादा आता ५ कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत रोजगारवाढीचे निर्णय घेण्यात आल्याचेही जावडेकर म्हणाले. देशात ६ लाखांपेक्षा अधिक एमएसएमई आहेत.त्यामुळे या एमएसएमईमध्ये असणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांना उभारी येण्याकरता कर्ज व्यवस्था देण्यात आली आहे. या क्षेत्रातील उद्योगांना कर्ज देण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सलून, पान, आणि छोट्या दुकानादारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.कोरोना काळातील संकटांच्या दृष्टीनं आज मोदी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरींनी दिली. शेतमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्याचं तोमर यांनी सांगितलं. ‘मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं तोमर म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम