७५ लाखाची लाच घेताना महापालिका अधिकारी मंदार तारी याला अटक

मुंबई - मुंबई महानगर पालिकेचा कार्यकारी अभियंता तथा प्रस्ताव विभाग पदनिर्देशित अधिकारी मंदार अशोक  तारी याला तब्बल ७५ लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवार दि.६ ऑगस्टला अटक केली. तारी याने अनधिकृत इमारत न पाडण्याबद्दल इमारत मालकाकडे दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता ७५ लाखाचा स्विकारताना तारी याला अटक करण्यात आली. तारी यांच्या बरोबर प्रतिक पिसे वय ३३  मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासीन शहा वय ३५ याला पण अटक करण्यात आली आहे.

यातील तक्रारदार व्यक्तीची चार मजली असून त्यामधले वरील दोन मजले अनधिकृत आहे. ही इमारत न पाडण्याबद्दल आणि नियोजित प्लॅट खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी तारी याने २ कोटीची लाच मागितली होती त्या नंतर तक्रारदार याने लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली त्यानुसार मंगळवार दि ६ ऑगस्टला  सापळा रचून ७५ लाखाची लाच स्विकारताना अटक केली.

लाचलुतप प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त संदिप दिवाण आणि अप्पर  पोलिस आयुक्त राजेंन्द्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

संबंधित पोस्ट