वसई-विरारःअवैध बांधकामावर एम आर टी पी सारखी कारवाई करा-खासदार गावित
- by Adarsh Maharashtra
- Aug 12, 2020
- 2579 views
वसई(प्रतिनिधी)- पावसामुळे वसई-विरार शहरात पाणी साचून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने त्याची पाहणी करण्याकरता खासदार राजेंद्र गावित यानी दौरा केला आणि तीव्र नाराजी व्यक्त करीत पालिका अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला
खासदार गावित यानी वसई पश्चिमेकडील सनसिटी-गास मार्ग,चुळने गावातील चौक बंगली रोड येथील नाल्यावर बांधण्यात आलेली तांदूळ बाजार इमारत,दत्तानी मॉल समोरील कोळंबी प्रकल्प, नवघर येथील मिठाघर वस्ती,नालासोपारा येथील आचोळे आणि सेट्रेंल पार्क परिसर या भागाची पाहणी केली,जे नाले अतिक्रमित झाले आहेत.ते मोकळे करणे तसेच अवैध इमारती विरोधात एम आर टी पी कायद्याने कारवाई करणे अशा सूचना खासदार गावित यानी केल्या आहेत यावेळी वसईचे प्रांतअधिकारी स्वप्नील तांगडे,तहसीलदार किरण सुरवसे,माणिकपूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे,प्रभारी सहाय्यक आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस आणि सुभाष जाधव शिवसेनेच्या माजी गटनेत्या सौ.किरण चेन्दवणकर,माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम ,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विवेक पाटील, शहर उपप्रमुख मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी पालिका आयुक्त गंगाथरण देवराजन व अप्पर पोलीस अधिक्षक विजय कांत सागर यांच्याशीही खासदार गावित यानी बैठक घेतली
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम