श्रीयोगीराज श्री गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सवाचे श्री क्षेत्र खोपोली येथे भव्य आयोजन!
- by Reporter
- Jul 16, 2024
- 245 views
खोपोली - सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वविख्यात योगीराज श्री गगनगिरी महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव, त्यांच्या लाखो भाविकांतर्फे, महाराजांच्या आवडत्या व अभिजात निसर्गसौंदर्याने नटलेल्या जगप्रसिद्ध खोपोली आश्रमात साजरा करण्यांत येणार आहे.
सदर धार्मिक उत्सव शनिवार दि. २० जुलै ते सोमवार दि.२२ जुलै २०२४ असा असून या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-कीर्तन-प्रवचन , नामस्मरण,होमहवन-भंडारा आदी धार्मिक विधींचे भव्य प्रमाणावर आयोजन करण्यांत आले आहे.