मुंबईत रिक्षाचालकाची ‘दादागिरी’! कट मारल्याच्या वादातून बाईकस्वाराला उडवलं, बघा धक्कादायक Video

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा मुजोरपणा अनेकदा समोर आलाय. रिक्षावाल्यांच्या दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून त्याचा फटका एका दुचाकीस्वाराला बसलाय. अंगावर काटा आणणारा अपघाताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कट मारल्याच्या रागातून बाइकस्वाराने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षा चालकाला जाब विचारला. दोघांमध्ये बराच वाद झाला. नंतर ग्रीन सिग्नल झाल्यामुळे दोघंही पुढे निघाले. पण, थोड्याचवेळात मुजोर रिक्षा चालकाने त्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तो गाडीसह रस्त्यावर पडला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो दुचाकीस्वार बचावला, कारण मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन त्याचा मृत्यूही होऊ शकला असता. केवळ सूड घेण्यासाठी म्हणून रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून रिक्षाचालका विरोधात चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.

हा व्हिडिओ नेमका मुंबईच्या कोणत्या परिसरातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील शिवाजीनगर भागातील महामार्गावर १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, रिक्षाचालकाला अद्याप अटक झाली की नाही याबाबत माहिती नाहीये, पण नेटकऱ्यांकडून त्या मुजोर रिक्षाचालकाविरोधात संताप व्यक्त होत असून अटक करण्याची मागणी होत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट