पुण्यात व्यवसायिकाची आर्थिक फसवणूक करणारा कथित बिल्डर मोकाट

पुण्यात गुन्हा दाखल तर जे.जे भायखळ्यातही फसवणुकीच्या तक्रारी

मुंबई : भायखळा जे. जे.मार्ग  पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी, त्याच बरोबर पुणे ग्रामीण ओतूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन देखील कथित बांधकाम व्यावसायिक जाकिरउद्दीन गपफर सय्यद हा मोकाट फिरत आहे.त्याच्या विरोधात अटकेची कारवाईकरण्यासाठी यातील तक्रारदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरी देखील आरोपीवर कारवाई करण्या ऐवजी त्याला पाठीशी घातले जात आहे.

ओतूर येथील जमिनीवरील बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप जाकिरउद्दीन याच्यावर करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या नुसार,जाकिरउद्दीन याने बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे महारेरा मध्ये संबंधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी केवळ स्वतःच्या नावावर करून भागीदारासह मूळ मालकाला देखील फसवण्याचे काम लिल्या केले आहे.हयात काही महा रेराच्या अधिकाऱ्यांचा देखील हात असल्याचा तक्रारदारान संशय व्यक्त केला आहे

गुंतवणूकदारांकडून मिळ्यालेला पैसा बांधकामासाठी न वापरता वैयक्तिक कारणांसाठी त्याचा वापर केला आहे. ठरलेल्या कालावधीत ना प्रत्यक्ष बांधिकाम सुरू झाले, ना जमीन मालकांना ठरलेली अनामत रक्कम देण्यात आली. त्यामुळे जमीन मालक व गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 

याप्रकरणी पुणे ग्रामीण ओतूर पोलीस ठाण्यात २७ डिसेंवर२०२५ रोजी भा. द.सं. १८६०४०६, ४२०, ४२३, ४६५, ४६८,४७१ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढ़ील पोलीस तपास सुरू आहे. जाकिरउद्दन गफ्फर सय्यद याच्या विरोधात मुंबईतील भायखळा पोलीस ठाणे येथे २ डिसेंबर २०२५ रोजी तसेच जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात २१ मे २०२५ रोजी फसवणुकी बाबत लेखी तक्रार करण्यात आली आहे. परंतु ह्या प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित पोस्ट