भुलेश्वर मधल्या दहीहंडीची सर्वत्र चर्चा सेलिब्रिटींना पाहायला गर्दी
- by Reporter
- Sep 03, 2024
- 232 views
मुंबई: दक्षिण मुंबईतील भुलेश्वर मार्केट येथे २७ ऑगस्ट रोजी सर्वात मोठा दही हंडी उत्सव पार पडला होता.ह्या प्रसंगी १२ लाख १२,२२१ रुपयांचे घवघवीत बक्षीस जाहीर करून संपूर्ण दक्षिण मुंबईत आयोजकांनी खळबळ माजवली होती ह्या दही हंडीचे आयोजन शिवसेना शिंदे गट २२१ चे शाखाप्रमुख संदीप काशीद व युवती कुलाबा विधानसभा समन्वयक तनुश्री काशीद यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी खास वैकुंठ धाम वाहनाची सुविधा मिळणार असल्याची घोषणा कार्यक्रमादरम्यान संदीप काशीद यांच्याकडन करण्यात आली होती. दही हंडी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
दही हंडी उत्सवात भाग घेणाऱ्या तब्बल १५० गोविंदा पथकांना रोख रकमेसह ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री व शहर पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा, स्थानिक आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांची उपस्थित दर्शवली
नगरसेवक आकाश पुरोहित रिटा मकवाना, हंसा बेन, सुनील नरसाळे सुशी बेन शहा, प्रमोद मांजरेकर ममताताई पालव दिलीप नाईक, नीलमताई पवार, दक्षिण मुंबई क्रमांक. १४ विभाग संघटक विजय वाडकर , तसेच विधानसभा प्रमुख विधानसभा संघटक, समन्वय व वा प्रमुख शाखाप्रमुख व शिवसेना शिंदे गटाच्या सर्व शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.
सेलिब्रिटींना पाहायला गर्दी
बॉलीवुड अभिनेत्री लीजा सिंग, दोन कोटी फॉलोवरचा टप्पा पार करणारी - भूमि काशीद, व कलारत्न सम्राट - प्राजक्ता साकटे ह्या दक्षिण मुंबईतल्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली होती या सेलिब्रिटींना पाहण्यासाठी नागरिकांनी भुलेश्वर येथे गर्दी केली होती.
रिपोर्टर