मंदिर वाचवण्यासाठी गिरगावात जनजागृती अभियान
आठवडाभर सुरू राहणार अभियान
- by Reporter
- Aug 11, 2024
- 390 views
मुंबई : संपूर्ण मुंबई पेक्षा दक्षिण मुंबईतल्या जागेला कमालीचा भाव आलेला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत एखाद्या चाळ किंवा जुन्या इमारतीच्या पुनर्वकासचे काम मिळाल्यावर विकासाक देखील मोठ्या प्रमाणात बक्कळ कमाई करत आहेत. मुंबईतल्या इतर एरिया पेक्षा दक्षिण मुंबईतली घरे करोडोंच्या घरात विकली जात असल्यामुळे गुजरात राजस्थान येथील विकासक मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. परंतु गेल्या पाच वर्षात मुंबईतल्या घरांचे भाव चौपट वाढल्यामुळे आता बंगलोर कर्नाटक येथील दिग्गज कंपन्या देखील मुंबईत एकरी जागा जमिनी विकत घेऊन उंच उंच टावर बांधताना दिसून येत आहेत. परंतु मुंबईतल्या जुन्या इमारती चाळींच्या जागेत विकास करताना त्या ठिकाणी असणारी पुरातन मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. विकासकाला जाब विचारल्यावर मात्र मंदिर पुन्हा बांधून देतो असं तोंडी उत्तर देऊन आपले काम साध्य करत आहेत.
दक्षिण मुंबई एकामागून अशी अनेक जुनी व पुरातन मंदिर विकासकांनी कोणत्याही परवानगी घेतल्या शिवाय तोडल्यामुळे व शासनाला नागरिकांना तक्रारी देऊन सुद्धा या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे आज गिरगावातील सकल हिंदू समाजाने गिरगावतल्या चौका चौकात जाऊन मंदिर वाचवण्यासाठी अभियान सुरू केले आहे त्याची सुर्वात आज ठाकूरद्वार नाक्यापासून करण्यात आली. ह्यावेळी नागरिकांनी हातात बॅनर पकडून घोषणा देत हिंदू मंदिर वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात आली. आता हे अभियान आठवडाभर अश्याच प्रकारे सुरू राहणार आहे.तसेच येत्या १७ तारखेला विकासकाने जमीनदोस्त केलेले पुरातन ओमकारेश्वर मंदिरासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदू समाजाने या महाआरती सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू सकल समाजा तर्फे करण्यात आले आहे.
रिपोर्टर