पी बी कोकरे लिहितात: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण चेकपोस्ट वरील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी चाकरमान्यांची छळवणूक त्वरित थांबवावी अन्यथा ?

कोरोना सारख्या महामारीचे संकट देशावर उभे असताना गेल्या २ महिन्यापासून देशांतर्गत पुकारलेल्या लॉक डाउन चा सामना सर्वसामान्य जनता काटेकोरपने करत असताना 

काही बऱ्याच कुटुंबियांनची आर्थिक परस्तीती उधोक व कामधंदा बंद असल्याने ढासळली असताना मुंबई, पालघर,ठाणे, पुणे येथून बरीच मंडळी आपल्या वृद्ध आई वडील व लहान मुलांना मूळ गावी सिंधुदुर्गनगरीत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत!

काही रीतसर इ पास नोंदणी करून येत आहेत तर काही योग्य कारण देऊन येत आहेत एव्हढे मोठे अंतर कापून आल्यानंतर १० किंवा २० किलोमीटर साठी त्या सर्वांना १ किंवा दोन दिवस चेक पोस्टवर थांबावे लागत आहे चेक पोस्ट वरील ठराविक अधिकारी ज्यांना वर्दीची किम्मत माहीत नाही टपोरी नाक्यावरून उचलून आणून उभे केले आहेत अशाच पदतीची भाषा वापरून अरेरावी समोरील व्यक्तीचा गलिच्छ शब्दात पाणउतारा सर्व पेपर योग्य असताना देखील अंगावर धावून जाणे इ पास स्कॅन होत नसतील तर त्यात प्रवाशांचा काय दोष ज्या कार्यालयातून पास देण्यात आले त्यांचा नंबर ईमेल आयडी सर्व त्या इ पास वर असताना स्कॅन होत नसतील तर डुप्लिकेट पास आहे म्हणून सांगत प्रवाशांना परत आलात तसेच मागे जा गाडी वळव असा नाहक त्रास का?

ज्या अधिकारीने दिलेले इ पास स्कॅन होत नसतील तर

संबंधित अधिकारी व कार्यालयावर कारवाई का होत नाही?

 याचा अर्थ योग्य कारण असताना देखील सर्वसामान्य जनतेला फक्त नाहक त्रास देने हाच एकमेव उद्देश आहे का?

तुम भी लुटो हम भी लुटते है मिल बाटके खाते है और पब्लिक को परेशान करके छोडते है

कोणी आवाज उठवण्याचा प्रयन्त केला तर खोट्या गुन्हा मध्ये अडकवून टाकू अशी धमकी देने 

शासनाने पुकारलेल्या लॉकडाउन चा फायदा उचलून हुकूमत व दादागिरी करून लहान व वयोवृद्ध नागरिकांची कदर नसलेल्या ठराविक वर्दीतील गुंडाना सर्वसामान्य नागरिक अति झाल्यावर घटनेने दिलेल्या अधिकाराची जाणीव करून देत असेल तर गैर काय?

येणाऱ्या काळात हे सर्व प्रकार थांबले नाहीत तर जनताच याना नक्कीच धडा शिकवेल तेंव्हा कायदा हातात घेतला म्हणून बोबल्या मारू नका कायदा हातात घेण्याची कोणाचीच इच्छा नसते पण वेळ त्याना मजबूर करते कायदा सर्वानसाठी समान असताना सर्वसामान्य जनतेची तुडवणुक का होत आहे त्याला जबाबदार कोण?

राज्य शासनाने याकडे वेळेतच लक्ष द्यावा व हे सर्व प्रकार त्वरित थांबवावेत 

टीप: मुंबई पुण्यावरून आपल्या मूळगावी येणाऱ्या नागरिकास कठोर भूमिका घेऊन जितका त्रास देत आहात 

तितकेच सतर्क राहून परदेशातून कोरोना सारखी महामारी घेऊन येणाऱ्याना अडवण्यासाठी १०% टक्के जरी योगदान दिले असते तर ही महामारीच आली नसती पण तुमची दादागिरी स्थानिक जनतेवरच चालते हे सिद्ध जाले

जनतेचा उद्रेक होण्या अगोदर आपली हुकूमशाही थांबवावी!

         श्री पी बी कोकरे

प्रमुख:महाराष्ट्र क्रांती संघटना

        मो ९५९४१२६४२७

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट