Fact Check :शिदनाक महार आणि भीमा कोरेगाव लढाईत लढलेल्या महार योध्याच्या व्हायरल फोटो मागील सत्य
- by Adarsh Maharashtra Fact Checker
- Jan 03, 2023
- 2815 views
१ जानेवारी २०२३ रोजी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला २०५ वर्ष पूर्ण झाली. इतिहासकारांच्या मते १ जानेवारी १८१८ साली पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं भीमा नदीच्या काठावर दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये तुंबळ युद्ध झालं.इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत ५०० सर्व जातीय सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला हरवलं.या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला. लढाईत इंग्रजांच्या २७५ सैनिकांचा मृत्यू झाला. तर पेशव्यांचे ६०० च्या आसपास सैनिक मृत्यूमुखी पडले. या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभ उभारला. त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला भेट दिली होती.
भीमा-कोरेगावची लढाई म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले पहिले बंड होते आणि त्याच लढाईत महार समाजाला यश मिळाले. म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाची आठवण म्हणून लाखो आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला भेट देतात.
२०१० पासून सोशल मीडियाच्या क्रांतीनंतर हा इतिहास लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि इथली गर्दी वाढू लागली. तसेच त्याच बरोबर महार समाजातील योद्धा शिदनाक महार आणि कोरेगाव भीमा लढाईतील महार सैनिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.
आदर्श महाराष्ट्रचे वाचक आनंद बेगडे यांनी या छायाचित्रांच्या सत्य पडताळणीसाठी विनंती केली असता आम्ही या संदर्भात सत्यता पडताळणी केली.
१) आदर्श महाराष्ट्रच्या Fact check पडताळणीत शिदनाक महार योद्धा म्हणून व्हायरल झालेला फोटो हा शीख योध्याचे काल्पनिक पेन्टिंग असल्याचे सिद्ध झाले आहे. आणि हे पेंटिंग सुप्रसिद्ध चित्रकार भगत सिंग बेदी यांनी काढलेले आहे.
https://www.sikhiart.com/product/prints-of-patialvi-baba/ या संकेत संस्थळावर ते उपलब्ध आहे.
२) आदर्श महाराष्ट्रच्या पडताळणीत पडताळणीमध्ये भीमा कोरेगाव लढाईत लढलेल्या महार सैनिकाचे दुर्मिळ छायाचित्र म्हणून व्हायरल होणारा फोटो दक्षिण आफ्रिकेतील झुलू देशाचा राजा ‘केटश्वायो’चा (Cetshwayo kaMpande ) असल्याचे स्पष्ट झाले आहे. Cetshwayo kaMpande हे नाव गूगल वर सर्च केले कि या राजाचे अनेक छायाचित्र आणि संदर्भ दिसतात.
https://www.britishempire.co.uk/forces/armycampaigns/africancampaigns/zuluwar/zuluwarcetshwayo.htm या संकेतस्थळावर या राजाचा फोटो आणि माहिती उपलब्ध आहे.
पडताळणी सत्य : आदर्श महाराष्ट्रच्या तथ्य पडताळणीत हे दोन्ही फोटों महार योध्यांचे नसून या दोन्ही फोटोंशी संबंधित पोस्टचा कोरेगाव भीमा लढाईशी काही संबंधित नाही.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम