अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा. ...
अखिल भारतीय ओबीसी महासभेची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
- by Adarsh Maharashtra
- Oct 22, 2020
- 4128 views
ठाणे दि. २२ ( गुरुनाथ भोईर ) आज रोजी अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या वतीने निवेदन देताना मा. ठाणे जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली की, जील्ह्यापासून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर असलेले मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यात जवळपास आठ,दहा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
यंदा शेतीची पिकं खूप मोठ्या प्रमाणात मिळणार अशी अपेक्षा बळीराजाला होती पण तोंडाजवळ आलेला घास हिराऊन घेतला निसर्ग राजानं. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे त्याला दिलासा मिळवा म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी तसेच यापुढे किमान ४ हेक्टरच्या आत शेतजमीन असलेल्या शेतकरी बांधवांना पीक विमा संरक्षण मोफत करण्याचे नियोजन. प्रशासन व सरकारने करावे जेणकरून शेतकरी राजा सुरक्षित होईल.असे निवेदन ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, कोकण विभागीय अध्यक्ष राजाराम ढोलम, सल्लागार ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर, उपाध्यक्ष सूरज शेटगे,मीडिया प्रभारी गुरुनाथ भोईर, बी आर एस पी ठाणे शहर नेते रामेश्वर बचाटे, रमण पाटील, मधुकर मोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या वतीने मा तहसिलदार (महसूल) राजेश चव्हाण यांनी निवेदन स्विकारले. १५ दिवसाच्या आत निर्णय कळवावे अन्यथा धरणे आंदोलन पुकारले जाईल असा इशारा दिला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम