मराठा आरक्षणाला आव्हान देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्टाबाहेर हल्ला
- by Adarsh Maharashtra
- Dec 10, 2018
- 1168 views
मराठा आरक्षणाला आव्हान देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्टाबाहेर सोमवारी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षणावर हायकोर्टात सोमवारी सुनावणी होती. सुनावणीनंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वैद्यनाथ पाटील असे हल्लेखोराचे नाव असून तो मूळचा जालना येथील राहणारा आहे. हल्लेखोराने 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा करत सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सदावर्ते यांच्या इतर सहकार्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम