स्वातंत्र्य दिना निमित्त बॉम्ब शोध पथक अधिकारी व श्वानांना रेनकोटचे वाटप
- by Reporter
- Aug 15, 2024
- 284 views
मुंबई:१५ आँगष्ट व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन काळाचौकी अभ्युदय नगर येथील बॉम्ब शोधक निकामी पथकातील अधिकारी, अमंलदार व पोलिसानं बरोबर कार्यरत आणि महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीसांच्या श्र्वानाना आज मुंबईतील सामाजिक संस्थेच्या वतीने पावसाळी रेनकोट चे वाटप करण्यांत आले.
या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी पोलीस बांधवांच्या हातात राख्या बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते जपणारा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. मुंबईत कार्यरत असणाऱ्या ह्या सामाजिक संस्थान तर्फे १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ३०० गोरगरीब लोकांनसाठी अन्नदान वाटपाचा ऊपक्रम आज पासून सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन डायरेक्टर चेअरमेन प्रेरणा रायचुर, क्लब प्रेसिडेंंट मीना शहा,सेक्रटरी सोनु पंजाबी तसेच पोलिस पत्नी व समाजसेविका सौ.कांचन संजय पाटील आय आय डब्ल्यू ह्या सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
रिपोर्टर