उल्हासनगर शहराची भयानक अवस्था . बेड उपलब्ध नसल्याने या रुग्णांचे काय होणार .
- by Rameshwar Gawai
- Jun 29, 2020
- 610 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोनाचा कहर हा दिवसे दिवस वाढत चालला आहे त्यामुळे बेड कमी पडत असल्याने येणाऱ्या काही दिवसात रुग्णांची काय अवस्था होणार . दरम्यान महापालिकेने कोविड रुग्णालये तर तयार केली आहेत परंतु त्या रुग्णालयात बेड पुर्ण पणे भरलेले आहे . त्यामुळे या पुढे येणारे पॉझिटिव्ह रुग्ण उपचारा करिता कोठे दाखल करावेत असा पेच महापालिके समोर उभा ठाकला आहे तेव्हा डॉक्टर असलेले आयुक्त हे काय नियोजन करतात या कडे लक्ष लागले आहे .
उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत चालला आहे . तेव्हा महापालिकेने उभारलेले कोविड रुग्णालये सध्य स्थितीत कमी पडायला लागले आहे . टेऊराम आश्रम . कोविड रुग्णालय कॅंप ४ . डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ( सी सी सी ) आय टी आय कोविड सेंटर .वेदांता महाविद्यालयात नव्याने तयार केलेले कोविड रुग्णालय या ठिकाणी कोविड रुग्णाना उपचारा करिता दाखल करन्यात आले आहे . तर ८०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होवुन घरी गेलेले असुन ७०० रुग्ण उपचार घेत आहेत . तरी पण रुग्णालयात बेड कमी पडायला लागले आहेत . दरम्यान कामगार रुग्णालयाला कोविड रुग्णालय बनवले असुन या रुग्णालयात जवळपास ७५ बेड आहेत . परंतु या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने त्या रुग्णालयातील रुग्णाना आय टी आय कोविड सेंटर व वेदांता कोविड सेंटर या ठिकाणी हलविन्यात येणार आहेत . त्यामुळे आता एक रुग्णालय कमी होणार आहे . तर महापालिकेच्या मदतीने उभारलेले सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल हे खाजगी रुग्णालय असुन या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतुन रुग्णाना सवलत देन्यात येणार आहे . परंतु सध्य स्थितीत शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे . दरम्यान संशयीत रुग्णांचे स्वॅब घेन्याची व्यवस्था टेऊराम आश्रम . आणि कॅंप ३ येथिल रेड क्रॉस सोसायटी या ठिकाणी करन्यात आली असुन रेड क्रॉस सोसायटी येथे कोरोनाची लक्षणे असलेल्याना उपचारा करिता दाखल करन्यात येते . मात्र इथे ही बेड पुर्ण पणे फुल झाले आहेत . दरम्यान शहरात महापालिकेला अधिक रुग्णालये तयार करन्याची गरज आहे . कारण कोरोनाचा कहर अधिक वाढत चालला आहे त्यामुळे रुग्णांवर उपचार होने ही गरजे चे आहे . तर महापालिकेने सस्पेक्टेड रुग्णा करिता सुध्दा रुग्णालय तयार करणे आवश्यक असुन या रुग्णाना शहरातील खाजगी रुग्णालये उपचारा करिता दाखल करुन घेत नाहीत . त्यांच्या वर सुध्दा उपचार होणे गरजेचे आहे . तरआयुक्त डॉ राजा दयानिधी एक डॉक्टर असुन ते या डॉक्टरी शिक्षणाचा कितपत फायदा करुन घेतात या कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम