मुंबई काँग्रेसने दिला नारा लढणार भिडणार मुंबई जिंकणारच
- by Reporter
- Aug 08, 2024
- 95 views
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीने नागरिकांसाठी नाना तऱ्हेच्या योजना राबवून जनतेला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसने देखील मागे न राहता विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत लढणार भिडणार आणि मुंबई जिंकणारचा नारा दिला आहे. याकरता १० ऑगस्ट पासून मुंबईतील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात मुंबई काँग्रेस तर्फे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या आदेशानुसार २०२४ सालात येऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई कॉँग्रेस तर्फे संपूर्ण मुंबईतील विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघ निहाय पदयात्रेची घोषणा करण्यात आली आहे. या पदयात्रेची सुरुवात दि. १० ऑगस्ट दक्षिण मुंबईतना करण्यात येणार आहे तसेच ही पदयात्रा दि. २ स्टेबर २०२४ पर्यंत मुंबईतील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये सुरू राहणार आहे.
मुंबई काँग्रेसच्या ह्या पदयात्रेची सुरुवात दक्षिण मुंबई विधानसभा क्षेत्र कुलाबा मुंबादेवी या विधानसभा क्षेत्रातून होणार आहे. असे पत्रक मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष व खासदार वर्षाताई गायकवाड ह्यांनी मुंबईतील आमदार खासदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना धाडून विधानसभेचे रणसिंग फुंकले आहे.
यावरून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी मुंबई काँग्रेसने आतापासूनच करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत लढणार भिडणार आणि मुंबई जिंकणार जिंकणार असा नारा देत काँग्रेसने मुंबईत कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
महायुतीत सामील असणाऱ्या पक्षांची तयारी पाहून महाविकास आघाडीला देखील नक्कीच घाम फुटणार आहे.
रिपोर्टर