टी-1 वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्नच झालेच नाहीत, हायकोर्टात दाद मागणार- डॉ.जेरील बानाईत
- by Adarsh Maharashtra
- Nov 03, 2018
- 5358 views
नागपूर- यवतमाळ जिल्ह्यातील टी-१ या हल्लेखोर वाघिणीला खाजगी शूटर असगर अली खान यांनी शुक्रवारी रात्री वाघिणीला गोळ्या घालून ठार मारले. वनविभागाकडून वाघिणीला बेशुद्ध करायचा प्रयत्न झाला परंतु हल्लेखोर वाघिणीने वन-अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याने नाईलाजाने तिला गोळ्या घालायचा निर्णय घेतला असा दावा वनविभागाकडून करण्यात आला. परंतु टी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्नच झालेच नाहीत आणि व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नमूद केलेली प्रक्रिया पार न पाडताच तिला ठार मारण्यात आले, असा आरोप वाघिणीला वाचविण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंतपर्यंत लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. जेरील बानाईत यांनी केला आहे. तसेच वन विभागाच्या कारवाई विरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
वन विभागाचा दावा अर्थहीन - डॉ. जेरील बानाईत यांचा दावा
डॉ. बानाईत यांनी वाघिणीला ठार मारण्यात येऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील वन विभागाची बाजू योग्य ठरविली होती. डॉ. बानाईत म्हणाले की, वाघिणीला ठार मारण्यात आले याचे अतीव दु:ख आहे. वन विभागाकडून तिला बेशुद्ध करण्याचे प्रयत्नच झालेले नाहीत. व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नमूद केलेली प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता तिला बेशुद्ध करता आले असते, असे आम्हाला वाटते. या कारवाईबाबत अनेक बाबी दडविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची केंद्र सरकारच्या पातळीवर विशेष पथकाकडून चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही परिस्थितीत राज्य वन विभागाकडून होणारी चौकशी आम्हाला अमान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम