इंडियन आर्ट प्रमोटर आयोजित “कलास्पंदन कला महोत्सव– २०१८”

दि. २३ ते २६ नोव्हेंबर, २०१८ हया दरम्यान नेहरू सेंटर मध्ये भारतातील विविध कलादालने व नामांकित चित्रकारांचा समावेश


मुंबई: इंडियन आर्ट प्रमोटर संस्थेतर्फे लास्पंदन कला महोत्सव  २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कला महोत्सव दि. २३ ते २६नोव्हेंबर, २०१८ हया दरम्यान मुंबईच्या वरळीयेथील प्रसिद्ध नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात येणार असून ११ ते ७ हया वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. हया भव्य कला मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवार दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री बींना बॅनर्जी व सिमरन आहुजा (मिस इंडिया मॅग्निफीसेंट वुमन आयकॉन २०१३) यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी कला आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ३०० पेक्षा जास्त चित्रकार,शिल्पकार व फोटोग्राफर भाग घेणार असून त्यांच्या १५०० च्यावर कलाकृतींचा तसेच विविध कलादालनांचा समावेश करण्यात आला आहे.

इंडियन आर्ट प्रमोटरने आयोजित केलेल्या हयाकला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार, शिल्पकार व फोटोग्राफर यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल,मिक्स मीडियम, ब्रोंझ, फोटोग्राफी, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. विद्यमान कलाजगतातील चित्रकारांच्या,शिल्पकारांच्या व फोटोग्राफीच्या विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण अशा १५०० च्यावर कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी सर्व कलाप्रेमी व रसिकांना हया कला मेळाव्यात पहायला मिळणार आहे.त्याचबरोबर हया प्रदर्शनात अनेक चित्रकारांचा लाईव्ह डेमो पाहायला मिळणार असून कला परीक्षकांद्वारा निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट ५० चित्रकार, शिल्पकार आणि फोटोग्राफर्सना पुरस्कार दिले जाणार आहेत.   

लास्पंदन कला महोत्सवात अबनिंद्र नाथ टागोर, आयुशी जैन, अभिलाषा उदयगीथ,आशा राघवा, अमिया निमाई धारा, अरुणावा रक्षीत, आतानू पॉल, अखिलेश गौर, बिजन चौधरी, भावना शेठ, बापूराव महाजन, देवीरानी दासगुप्ता, दिपांकर गांगुली, डॉ. दिव्या शर्मा,फहमीदा खातून, गौतम दास, गोमथी शिवा,हितहरी दास वैष्णव, एच. एल. शाक्यवार,आयपीएस कल्याण मुखोपाध्याय, जेमिनी रॉय, जोगेन चौधुरी, ज्योती कुलदीप मलिक,ज्योतिर्मय दलपती, जगन चक्रवती, कमल कोरिया, के विजयकिरण, कविता जोशी,कौस्तव ज्योती दासगुप्ता, कौसर हुसैन मसूद,कुणाल शियाणी, लक्ष्मण गौड, लक्ष्मीनारायण शर्मा, एम. एफ. हुसैन, गोविंद नारायण मालाडकर, मो. हबीब उल्लाह बहार, मृदुला नायर, मो. युसुफ शेख, मिलानेन्दू मोंडल,मिनाक्षी कंबोज, मोही जया, निखिल बिस्वास,निशा गुप्ता, परमेश पॉल, प्रियदर्शिनी ओहोळ,पल्लवी पाठक, प्रज्ञा पाटील, परशुराम पाटील,प्रसंता खातूआ, रामजी शर्मा, रामजी अग्रवाल,रुक्साना हूडा, रूपा मित्रा, रिता जैन, आर. के. बिस्वास, रिना मालविया, रामेश्वर जिंगर,रेणुका श्रीधर, एस. एच. रझा, सुहास रॉय,संदीप रावळ, सिमरोन दातवाणी, सुधा आहुजा, सुब्रता कर्माकर, सोनी अमरनाथ,शिवानी नाडकर्णी, शोभा हरीहरन, स्वपन साहा, स्वपन चटर्जी, शिरीश कथाळे, शुभांगी तेलंग, सहेली पाल, सुब्रमण्यम कोलूसू, सीलम श्रीनिवासा रेड्डी, सविता यादव, सुलोचना गावडे, सोनजय मौर्य, सरत शॉ, शीला शर्मा,संजय म्हात्रे, संगीता निगम, सुब्रता बंडोपाध्याय, सौरव झा, श्वेता भालेराव, श्वेता मंजु सिंग, सुधा झुणझुणवाला, सब्बीर लोयनमून, तेजल पाचपांडे, तेजल देशपांडे,ताजनिन मनन, तमाली दास, उमा कृष्णमूर्ति,वॅन्डी जाईस, योगेश बर्वे अशा अनेक नामांकित कलाकारांच्या चित्र, शिल्पाकृती व फोटोग्राफीपाहायला मिळणार आहेत. तसेच हया महोत्सवातअर्पितम कला मंदिर, आर्ट स्क्वेअर, बांगला,क्रिएटिव आर्ट अफेर्स, कॉस्मो आर्ट गॅलरी,एक्सपोज कंटेमररी आर्ट गॅलरी, कलाकार फाऊंडेशन, कलाधाम अकादमी, माँ शारदा ग्रुप, राबी आर्ट गॅलरी, थर्ड आय, गॅलेरीया डे आर्टी इत्यादी कलादालनांचाही सहभाग असणारआहे. हा कला महोत्सव दि. २३ ते २६ नोव्हेंबर,२०१८ हया कालावधीत रोज ११ ते ७ हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे.

इंडियन आर्ट प्रमोटर ही मुंबईतील ऑनलाइन कलाप्रवर्तक संस्था गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ही संस्था त्याद्वारे अनेक होतकरू व गुणवंत कलाकारांना उत्तेजन देऊन एक प्रकारे त्यांच्या गुणांचे संवर्धन करते. भावी काळात भारतातीलअनेक शहरात व परदेशात अशी सामूहिक प्रदर्शनेतसेच कला महोत्सव आयोजित करण्याचा हया संस्थेचा प्रयत्न असून त्यादृष्टीने त्यांची योग्य ती वाटचाल सुरू आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट