मनोरमध्ये घरफोडी करणाऱ्या भिवंडीतील अट्टल चोरांना अटक

पालघर (प्रतिनिधी/9 ऑगस्ट)पालघर तालुक्यातील मनोर येथील दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या भिवंडीतील 3 अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटकडून अटक करण्यात आली आहे. या चोरांनी एक महिन्यापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास मनोरमधील जयश्री मार्ट या दुकानाचे शटर तोडून येथील 88 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून  पोलिसांनी तपास केला असून बाबू यादव, आदिल मोमीन (दोघेही रा. भिवंडी) व समीर पटेल (रा. डोंबिवली) या 3 अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोरांना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे बोईसर युनिट प्रमुख पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक व सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला असून या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये भादविसं 457, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून अधिक तपास मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर हे करीत आहेत.

संबंधित पोस्ट