अंबरनाथ येथे सराईत गुंडाचा पोलिसावर हल्ला,त्या हल्ल्यात पोलिस जबर जखमी .

अबरनाथ(प्रतिनिधी) :  शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता अंबरनाथ पोलीस ठाण्या  समोरील कल्याण- बदलापूर रस्त्यावर चार सराईत गुंडांनी धारदार शस्त्रांनी एका पोलीस हवालदारावर जीव घेणा हल्ला केल्याची घटना घडली असून परिसरात काहीवेळ ट्रॅफिक जाम झाल्याने  लोकांना पोलीस व  गुंड यांच्या मधील थरार पहावयास मिळाला,दरम्यान अंबरनाथ येथून फरार झालेल्या चार ही  हल्लेखोरांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे,त्यांना काल  उल्हासनगर चोपडा न्यायालयात   हजर केले असता न्यायालयाने २८  ऑक्टोम्बर पर्यंत चार ही आरोपीना  पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या बाबत पोलिसानी दिलेल्या माहीती नुसार  उल्हासनगर येथिल मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस  हवालदार बाळू गणपत चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते उल्हासनगर येथुन बदलापुर कडे आपल्या मोटर सायकल ने जात असताना  त्याना अंबरनाथ च्या दिशेने जाणाऱ्या आय २०  लाल रंगाच्या कार क्र, एम.एच.४८  ए. सी.९१९४  या कार चालकाच्या हालचालींबद्दल संशय आला म्हणून त्यांनी पाठलाग करत अंबरनाथ येथील मटका चौकामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदर आरोपींना पुढील गुन्हे करण्यापासून अटकाव करण्याच्या हेतूने,कार थांबविन्याचा प्रयत्न केला,  परंतु कार चालकाने कार न थांबवता  पुढे अंबरनाथ पोलिस स्टेशन पर्यंत रस्त्यावर कार वेगाने पळवली मात्र पुढे ट्रॅफिक जाम झाल्याने पोलीस हवालदार बाळू चव्हाण याने संधी चा फायदा घेत त्यांच्या  गाडी समोर आपली मोटर सायकल  घातली,त्यामुळे सदर आरोपी यांनी चिडून जाऊन कार मधून उतरून पोलीस हवालदार  बाळू चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.  त्यामध्ये पोलीस हवालदार बाळू चव्हाण गंभीर जखमी झाले,पोलिसांनी त्यांना अंबरनाथ येथील छाया रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले .  

दरम्यान ट्रॅफिक जाम झाल्याने कार मधील चारही आरोपी यांनी रस्त्यावरील  एका रिक्षाचालकाला शस्त्रा चा धाक दाखवून त्याच्या रिक्षातून उल्हासनगरच्या दिशेने पलायन केले, घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून पोलिसांनी झोन ४  मधील सर्व पोलीस ठाण्यात घटनेची त्वरित माहिती दिली, त्यानंतर मध्यवर्ती पोलीस व विठ्ठल वाडी पोलिसांनी  अर्ध्या तासात अतिशय  शिताफीने या  चार ही जणाना  आपल्या ताब्यात घेतले आहे तर या चार ही  आरोपी विरुध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सुध्दा गुन्हा दाखल झाला आहे . दरम्यान पोलिस हवालदार बाळु चव्हाण याना पुढील उपचारा  करिता उल्हासनगर कॅंप ३ येथिल क्रिटीकियेर या रुग्णालयात दाखल केले आहे


तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी दिलखूश  उर्फ अंकित महेंद्रप्रसाद त्याचा भाऊ अंकुश महेंद्रप्रसाद व त्यांचे अन्य दोन साथीदार युवराज नवनाथ पवार, व  अबीद अहमद शेख, यांना अटक करून त्यांचे वर गुन्हा रजिस्टर न .५६७  / २०२० ,  . ३०७ ,३५३ ,३९२ , ३४  व  ४ ,व २५ या कलमा  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या चार ही आरोपीना न्यायालयाने २८ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवन्याचे आदेश दिले आहेत .पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यानी मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांचे कौतुक करुन हवालदार बाळु चव्हाण यानी दाखवलेली सावधानता व हिमंत याला दाद देत त्यांचे अभिनंदन केले .

संबंधित पोस्ट