आजरा येथील कुमार भवन शाळेत अंगणवाडी सेविकांचे ध्वजारोहण .....

आजरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात आज अंगणवाडी सेविकांनी  दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी ध्वजारोहण केले.

आजऱ्यातील मुख्य बाजारपेठेतील कुमार भवन प्रशाळेत या वेळी हे झेंडावंदन पार पडले.कोरोनाच्या काळात ही आपल्या  कर्तव्यात कोणतीही कुचराई न करता खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चालूच ठेवले असून अंगणवाडी सेविकांनी आज स्वातंत्र दिनादिवशी ही झेंडावंदन करून आगळावेगळा संदेश समाजाला दिला.

यावेळी  प्राथमिक शाळेचे सुभाष  नाईक सर,दिवेकर सर,तिप्पट मॅडम,छाया कांबळे, सीमा चिकुर्डे ,हेमाली पाटील,रेवती कुंभार,उषा पाटील,चित्रा पाटील,वैशाली कुंभार ,राणी साळुंखे ,शशिकला इंगळे आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट