देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव रामणवाडी

कोल्हापूर: देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते, पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे. 

रामणवाडी (ता. राधानगरी) या गावात 80 देशी गाई आहेत. त्या गावाने डेअरी सुरू केली आहे. विस रुपये प्रतिलिटर दराने गोमुत्राची खरेदी केली जात आहे. या गोमुत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे. 

गोमुत्रातील औषधी ताकद आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे.

रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्याचा प्रत्ययही आल्याने गोमुत्राला "डिमांड‘ आहे.आयुर्वेदिक साबण व इतर औषधे तयार करण्यासाठी कोल्हापुरातून हरिद्वारला गोमूत्र पाठविले जाते.

येथील वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गाईंच्या पालनाची सामुदायिक ताकद दिसावी, यासाठी रामणवाडी गावात सत्तर ते ऐंशी गाई गावकऱ्यांच्या साहाय्याने पाळल्या. गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच.

शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला.बैलांनी ओढलेल्या घाण्यातील तेल वापरणारी कही कुटुंबे आहेत. 

यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे.

गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे, पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हते.

देश - विदेशातील शोधप्रबंध, इंटरनेटवरील माहिती चर्चेत येऊ लागली; तेव्हा गोमुत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवू लागले.  तोपर्यंत गाईंची संख्या कमी होत गेली. 

गाय म्हणजे दूध आणि दूध द्यायची बंद झाली, की तिची रवानगी कत्तलखान्याकडे, हे ठरून गेले होते.पण,रामणवाडी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गाई पाळून त्यांचे विविध अंगांनी असलेले महत्त्व ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे.

सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत विस रुपये लिटर दराने घालतात. रोज एक गाय साधारण गोमुत्राच्या माध्यमातून ११० ते १२० रुपये मिळवून देते. मात्र या गोमुत्रातून पुढे अमूल्य असे औषध तयार होते.

देशी गाईचे वाळलेले शेण "रानगोवरी‘ या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते. 

अनेक धार्मिक विधी व जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते. 

गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो. (हीच पद्धति 'अग्निहोत्रात वापरली जाते.

या पार्श्‍वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यात चांगलाच यशस्वी झाला आहे. वेणुमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. एका नव्या प्रयोगाची ही सुरवात आहे. ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांनी गोमूत्र विकायचे राहू दे, पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे.

गोमूत्र, गाईचे शेण याची वैज्ञानिक आधारावर संपूर्ण माहिती राहुल देशपांडे  यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे.

वाढती मागणी

सध्या "गोधन‘ या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून ... 

एक लिटर अर्क केलेले गोमूत्र १२५ रुपयांना, 

२०० मिली गोमूत्र ३५ रुपयांना व पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून ..

१० मिली गोमूत्र १० रुपयांना विकले जाते.

पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राला मागणी वाढली आहे.

देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत. 

गाय, दुधाला कमी झाल्यावर, मारून टाकण्या पेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणा पासून मौल्यवान शेणखत, तसेच त्यातून मिथेन हा gas तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे.

शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.आज मनुष्य अनैतिक कामात नको तिथे तोंड घालतो, काहीही घाण खातो. पण आज त्याला गोमूत्र पिण्याची लाज वाटते. 

देशी गायीच्या गोमुत्राने कैंसर बरा होतो. गाईचा स्पर्श नकोसा वाटतो. ज्या लोकाना रक्तदाबाचा त्रास आहे.त्यानी देशी गायीच्या पाठीवर व शिंडापासुन शेपटापर्यंत पाच मिनिट हात फिरविल्यास रक्तदाबाचा त्रास दुर होतो. गाईचे शेणही औषधी आहे.देशी गायीचे शेण विषशोषक आहे. शेण रेडिएशन शोषते.

पण आज आपला दरिद्रीपणा असा कि आपल्या देशी गाई कत्तलखान्यात कापल्या जात आहेत. तिच्या मांसावर आपण पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवत आहोत.

जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ करावे.


 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट