अंबरनाथ-बदलापूर शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्य किट, हँड सॅनिटायझर व मास्कचे वाटप.

अंबरनाथ / प्रतिनिधी : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले  असून लॉकडाऊन मुळे वृत्तपत्र विक्रेत्यांची परिस्थिती खराब झाली होती. या स्थितीला  शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर व अंबरनाथ तालुका पत्रकार परिषद यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन  अंबरनाथ-बदलापूर मधील "वृत्तपत्र विक्रेते आणि लाईन बॉय" यांना "अन्नधान्य किट, हँड सॅनिटायझर व मास्कचे वाटपाचा" कार्यक्रम अंबरनाथ तहसील कार्यालय येथील पत्रकार कक्ष या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. "अन्नधान्य किट, हँड सॅनिटायझर व मास्कचे वाटप" युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य तथा मा. नगरसेवक अ‍ॅड. निखिल वाळेकर व अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

सुमारे १०० वृत्तपत्रे विक्रेते व लाईन बॉय आदींना सदर वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अंबरनाथमधील सर्व पत्रकार व विक्रेता अध्यक्ष अरविंद निकम हे उपस्थित होते. शासनाने घरोघरी वृत्तपत्र पोहचविण्या साठी परवानगी दिलेली असून अंबरनाथ-बदलापूरमधील वृत्तपत्र विक्रेते व लाईनबॉय यांना अन्नधान्याचे किट,मास्क व सॅनिट्रायझरचे आज वाटप करण्यात आले. वृत्तपत्रे विक्रेते व लाईन बॉय यांनी वृत्तपत्र घरपोच पोहचवताना विशेष काळजी घ्यावी, मास्क व सॅनिट्रायझरचा वापर वेळोवेळी करावा. असे आवाहनही युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य तथा मा. नगरसेवक अ‍ॅड. निखिल वाळेकर यांनी केले.

 तर शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, राजेंद्र वाळेकर व अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील आदींचे अंबरनाथ-बदलापूर वृत्तपत्र संघटनेकडून कार्याध्यक्ष कुंदन जाधव यांनी आभार मानले .

संबंधित पोस्ट