समाजातील सुसंस्कृत नेतृत्व महात्माजी गणपत लकडे यांच निधन.

नवीमुंबई (प्रतिनिधी) : समाज प्रबोधन असो वा कुटुंब असो आप्तेष्ट परिवारातील मित्र परिवार असो महात्माजी गणपत लकडे एक तेजस्वी व्यक्तीमत्व स्वतःच्या शुद्ध विचाराने प्रेमळ आवाजाने आणि आपुलकीच्या वाणीने परक्या लोकांना पण आपलेसे करून घेणारे एखाद्या मुक्या माणसालाही बोलायला लावतील अस सामर्थ्य असणारे अभ्यासक, अफलातून व्यक्तीमत्व सतत समोरच्यांचा फायद्याचा विचार करणारे संपूर्ण जिवनात त्यांनी नकारत्मक विचार केला नाही आणि कोणाला करून पण दिला नाही. नेहमी सकारत्मक विचार करायचे आणि दुसऱ्यांला आपल्या विचाराने सकारत्मक विचार करायला लावणारे प्रेमळ स्वभावाचे महात्माजी गणपत लकडे यांचे दि.१८ सप्टेबर रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहेत. शेवटपर्यंत करत होते  ते समाजातील सर्व थरातील लोकांसाठी अगदी जवळचे होते. निरंकारी बाबा हरदेवसिंह यांच्या प्रबोधन कार्यात झोकून देशभर प्रवचने देऊन तळागाळातील लोकांसाठी  मौल्यवान कार्य करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, ३ मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.  प्रेमळ व्यक्तीमत्वच आपल्यातून अचानक या जाण्याने सर्व समाजातील लोक आप्तेष्ट मित्र परिवार आज पोरका झाला.

संबंधित पोस्ट