प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्विस कंपनी खातेय २०० माथाडी कामगारांच्या 'टाळू'वरच लोणी! २०० माथाडी कामगारांच्या जागी दाखविले आहेत ५ बोगस कागदी कामगार

तळोजा एमआयडीसी मधील 'स्नो मॅन लॉजिस्टिक आणि व्हिस्टा प्रोसेस फूड्स'कडून शासनाला कोट्यवधींचा चुना; हेच का ते अच्छे दिन? कामगारमंत्री संभाजी निलंगेकर घेतील का दखल?

प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्विस कंपनी खातेय २०० माथाडी कामगारांच्या 'टाळू'वरच लोणी! २०० माथाडी कामगारांच्या जागी दाखविले आहेत ५ बोगस कागदी कामगार

तळोजा एमआयडीसी मधील 'स्नो मॅन लॉजिस्टिक आणि व्हिस्टा प्रोसेस फूड्स'कडून शासनाला कोट्यवधींचा चुना


 नवी मुंबई: प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्व्हिस ही कामगार सेवा पुरविणारी कंपनी अनेक कंपन्यांना कामगार पुरवीत आहे. शेखर सावंत, विद्याधर पाटील आणि आशिष मोकळ हे तिघे प्रिझम फॅसिलिटीजचे भागीदार आहेत. प्रिझम फॅसिलिटीज तळोजा एमआयडीसी मधील स्नो-मॅन लॉजिस्टिक आणि व्हिस्टा प्रोसेस फूड्स आदी कंपन्यांना कामगार पुरविण्याचे काम करत आहे. स्नो-मॅन आणि व्हिस्टा प्रोसेस फूड्स मध्ये एकूण २०० कामगार काम करीत आहे. मात्र प्रिझम फॅसिलिटीज आणि स्नोमॅन कंपनीने शासनाला कागदोपत्री फक्त ५ कामगार दाखवले आहेत. बोगस कामगारांच्या नावावर आतापर्यंत प्रिझम कंपनीने पगार स्वरूपातील लाखो रुपये गडप करीत शासनाची फसवणूक केलेली आहे.


नक्की काय आहे हा भ्रष्टाचार आणि कोण आहेत हे बोगस कागदी कामगार

 स्नोमॅन लॉजिस्टिक या तळोजास्थीत कोल्ड स्टोरेज कंपनीकडे एकूण २०० कर्मचारी काम करीत आहेत. कामगार नियमानुसार प्रत्येक माथाडी कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. परंतु स्नो मॅन कंपनीने फक्त ५ कामगारांची नोंद किराणा बाजार आणि दुकाने मंडळ(ग्रोसरी बोर्ड) कडे केलेली आहे. ही पाच ही कर्मचारी बोगस आहेत. या पैकी एकही कामगार प्रत्यक्षात तेथे काम करीत नाही. आणि मुख्य म्हणजे ही सगळी कागदोपत्री दाखवलेली  बोगस कामगार ही कामगार सेवा पुरवणारी प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीच्या मालकांची मुले आणि नातेवाईक असल्याचे समोर आले आहेत. कंपनीने दाखविलेल्या पाच बोगस कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे:- विनायक हितेंद्र गावंड , ऋत्विक शेखर सावंत, अपूर्व गिरीधर पाटील, सुबोध भगवान चव्हाण आणि प्रकाश तुकाराम शिंदे.


     ऋत्विक सावंत

यातील ऋत्विक सावंत हे एमबीए झालेला विद्यार्थी असून प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंटचे भागीदार मालक शेखर सावंत यांचा  सुपुत्र आहेत. अपूर्व गिरीधर पाटील हे कंपनीचे दुसरे मालक विद्याधर पाटील यांचे पुतणे आहेत आणि विनायक हितेंद्र गावंड हे कंपनीचे तिसरे मालक आशिष मोकल यांचे भाचे आहेत. प्रकाश शिंदे हा GS4 सुरक्षा कंपनीचा निलंबित कर्मचारी आहे. तसेच त्याच्यावर कोर्टात केस चालू आहे. स्वतःच्याच नातेवाईकांना कर्मचारी दाखवून प्रिझम फॅसिलिटीज कंपनीने आतापर्यंत शासनाकडून लाखो रुपये हडपले आहेत.

 

स्नोमॅन लॉजिस्टिक आणि व्हिस्टा प्रोसेस फूड्स कंपनी बुडविते शासनाचा दरवर्षी तब्बल १.२५ कोटींचा महसूल

 स्नोमॅन लॉजिस्टिक आणि व्हिस्टा फूड्स प्रोसेस सारख्या कंपन्या लेव्ही स्वरूपात मिळणारा शासनाचा करोडोंचा महसूल बुडवीत आहेत. २०० कामगारांच्या जागी फक्त ५ कर्मचाऱ्यांच्या नोंदी शासनाकडे करून शासनाला फसवित आहे. एका कामगारांमागे अंदाजे ५ हजार रुपये म्हणजे २०० कामगारांमागे १.२५ ते १.५० कोटी रुपयांचा लेव्ही मार्फत सरकारला मिळणारा महसूल या कंपन्या बुडवीत आहेत. यामध्ये या कंपन्यांसोबत ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी आणि कामगार सेवा पुरविणारी प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्विस यांची मिलीभगत असण्याची दाट शक्यता आहे


किराणा बाजार आणि दुकाने मंडळ(ग्रोसरी बोर्ड) येथील अधिकारी भ्रष्टाचारात आहेत का सामील?

 स्नो मॅन आणो व्हिस्टा फूड्स चे कामगारांचे प्रकरण किराणा बाजार आणि दुकाने मंडळ(ग्रोसरी बोर्ड) यांच्या अखत्यारीत येते. कामगारांची नोंद या विभागा तर्फे  केली जाते. ग्रोसरी बोर्डाकडून पडताळणी होत असते. या पडताळणीचा अहवाल(Verification  Report ) दै.आदर्श महाराष्ट्रकडे उपलब्ध आहे. या अहवालात वरील पाच पैकी फक्त तीन बोगस कर्मचार्यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु आदर्श महाराष्ट्र कडे खात्रीलायक माहिती आहे की नावे असलेली ही तीन कामगार तेथे काम करीत नाही.  या पाच पैकी दोन कर्मचाऱ्यांची नावे पडताळणी अहवालात नाही. आणि ज्या तीन कामगारांची नावे आहेत तेही तेथे काम करीत नाही. असे असताना ही बेकायदेशीरपणे  पाच जणांची नोंदणी कंपनी ग्रोसरी बोर्डाकडे कशी काय करू शकते? तसेच यांचा पगार स्नो मॅन आणि व्हिस्टा कंपनी का देते? असा प्रश्न निर्माण होतो. ग्रोसरी बोर्डाचे पडताळणी अधिकारी सी.एल. कोचळे आणि एल.व्ही.खोपडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता, ते म्हणाले की आम्ही अडीच वर्षापूर्वी कामगारांची तपासणी केली असता सदर पाच कर्मचारी काम करताना आढळले. पडताळणी अहवालात त्या पाच पैकी दोन कामगारांचा उल्लेख नसताना ग्रोसरी बोर्डाचे हे अधिकारी खोटे का बोलत आहेत? सदर बोगस कामगारांना पाठीशी का घालीत आहेत? यामध्ये अधिकाऱ्यांचे काय हितसंबंध दडलेले आहेत? तसेच या घोटाळ्यात माजी निरीक्षक माधुगडे यांचेही नाव असण्याची शकयता आहे. हा घोटाळा घडत असताना ग्रोसरी बोर्डाचे अध्यक्ष विजयकांत पाणबुडे गप्प का? की तेही या घोटाळ्यात सामील आहेत? असे असे असेल तर हा फार मोठा आर्थिक घोटाळा असून याची गंभीर दखल घेऊन शासनाने चौकशी करणे आवश्यक आहे.

 

हेच का ते अच्छे दिन? कामगारमंत्री संभाजी निलंगेकर घेतील का दखल?

 माथाडींच्या 'टाळू'वरचे लोणी खाणाऱ्या भांडवलदार कंपन्यांची आणि त्यांच्यासोबत मिलीभगत करणाऱ्या ग्रोसरी बोर्डाचे अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कामगारमंत्री कारवाई करतील का? ..अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले भाजप सरकार गरीब आणि कष्टकऱ्यांवर अन्याय का करीत आहे तसेच शोषण करणाऱ्या भांडवलदार कंपनी आणि त्यांना सामील असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई का करीत नाही? असा उद्विग्न सवाल इतर माथाडी करीत आहे. कामगारमंत्र्यांनी माथाडींच्या या प्रश्नांची तात्काळ गंभीर दखल घेऊन ग्रोसरी बोर्डाचे अध्यक्ष विजयकांत पाणबुडे, पडताळणी निरीक्षक सी.एल. कोचळे, कारमिक एल.व्ही खोपडे आणि माजी पडताळणी निरीक्षक माधुगडे यांचे तात्काळ निलंबन करावे आणि चौकशी समितीद्वारे या भ्रष्टाचाराची पाळेमुळे बाहेर काढावीत. तसेच स्नोमॅन,व्हिस्टा फूड्स आणि कामगार सेवा पुरविण्याच्या नावावर फसवणूक करणारी प्रिझम फॅसिलिटीज मॅनेजमेंट कंपनींवर फसवणूक ४२० चा गुन्हा नोंद करून कंपनीचे लायसन्स रद्द करावे असे आवाहन इतर माथाडी करीत आहेत.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट