कानडी नाट्यावर अखेर पडदा; भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला
- by Adarsh Maharashtra
- Jul 29, 2019
- 3933 views
बंगळुरू- काँग्रेस-जेडीएस आघाडीची कर्नाटकातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपकडून गेल्या अनेक दिवसांपासून जे प्रयत्न सुरू होते त्याला अखेर यश आले. भाजपने काल कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकून आपले बहुमत सिद्ध केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात रंगलेल्या राजकीय महानाट्यावर पडदा पडला आहे.
कर्नाटकातील या महानाट्याची सुरवात १४ आमदारांच्या बंडखोरीने झाली होती. या आमदारांना भाजपने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरक्षित ठेवले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांबाबत सभापतींनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आदेश दिले. दरम्यान काँग्रेसकडून या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते ऐकले नाहीत. अखेर सभापती रमेशकुमार यांनी १७ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले. त्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे येडीयुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेसाठी दावा केला. तो राज्यपालांनी मान्य करताच येडीयुरप्पा यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि काल कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले. भाजपच्या बाजूने १०६ आमदार उभे राहिले आणि भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला.आता कर्नाटकात भाजपची सत्ता आली असून येडीयुरप्पा हे पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम