आदिवासी समाज विकास सेवा संस्था किन्हवली कार्यालयाचे उदघाटन
- by Mahesh dhanke
- Sep 22, 2020
- 3236 views
शहापूर( महेश धनके) आदिवासी समाज विकास सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यातील सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचावी व ती सेवा नागरिकांना घरपोच मिळावी, या गोष्टींकरिता संस्थेने पुढाकार घेतला आहे.प्रत्येक नागरिकाने आनंदाने, सुख - समाधानाने व चिंतामुक्त जीवन जगून आत्मनिर्भर बनावे"हे संस्थने ध्येय ठरवले आहे.
सदर संस्थेने चालू परिस्थितीचा विचार करून जनसामान्यांचे अपेक्षित प्रश्न सोडविण्याची भूमिका हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत १०वी/१२वी चे रिझल्ट लागले असून, पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी अनेक गोष्टींची गरज भासत आहे, त्यात जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, रेशनिंग कार्डची कामे, आधार कार्ड संदर्भातील कामे, शेतकरी दाखला, यांसारखे अनेक शासकीय दाखल्यांच्या शिबिराच्या आयोजन व कोरोणच्या परिस्थितीतही आपल्या गावातील नागरिकांच्या सुविधांसाठी झटणाऱ्या गाव केंद्रातील कर्मचाऱ्यांचा *"कोरोना योध्दा"* प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य सुभाष हरड सर, पंचायत समिती सदस्य तथा संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ वाख साहेब, किन्हवली विभागाचे दै. सकाळ वर्तमान पत्राचे पत्रकार श्यामकांत पतंगराव, नवनिर्माण फाऊंडेशनचे राजेश घागास सर, धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे गणेश चौधरी, तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निखिल मोंडुळा व त्यांचे संचालक मंडळ, त्याच बरोबर अखिल भारतीय स्वयं सहाय्यता संघाचे संस्थापक श्री. नयन जाधव, अध्यक्ष श्री. गुरुनाथ उघडा व त्यांचे सहकारी, त्याच बरोबर विविध ग्रामपंचायत हद्दीतील गाव विकास केंद्र चालक, संस्थेचे प्रोजेक्ट को ऑर्डीनेटर संदीप नाटकरे, सहाय्यक प्रोजेक्ट को ऑर्डीनेटर विठ्ठल सूर्यवंशी व संस्थेचा कर्मचारी वर्ग, याच बरोबर नवी मुंबई विभागाचे कुमार शिरावले व त्यांची टीम देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. संजय गगे खरिडकर यांनी केले, तर आभार श्री. रवींद्र हरड यांनी मानले
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम