हभप शंकर महाराज शिंदे यांची वारकरी संप्रदाय व आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड
हभप शंकर महाराज शिंदे यांची वारकरी संप्रदाय व आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड
- by Mahesh dhanke
- Sep 02, 2020
- 3081 views
शहापुर (महेश धानके) ठाणे पालघर रायगड,नाशिक,जालना जिल्ह्यात आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करणारे मुरबाड तालुक्याचे भूमिपुत्र हभप शंकर महाराज शिंदे यांची कुंभार समाज संघ प्रणित वारकरी संप्रदाय व आध्यत्मिक आघाडीच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाज संस्थेचे राज्य अध्यक्ष सतीश दरेकर यांनी या आध्यत्मिक आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली असून मुरबाडचे भूमिपुत्र शंकर महाराज शिंदे (रा.म्हाल्हेड)यांच्यावर प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे,शंकर महाराज शिंदे हे गेली अनेक वर्षे राज्यभर कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन,व आध्यत्मिक सेवा देत आहेत,त्यांना त्यांच्या या सेवेबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहे,संसार मोहमायेत गुंतून त्रस्त झालेल्या प्रत्येकाचा संसार सुखाचा होऊन त्याला स्वानंद सुख मिळावे म्हणून शिंदे महाराजांचे कार्य अखंडपणे सुरू आहे,राज्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून वारकरी संप्रदाय व आध्यत्मिक आघाडीच्या राज्य अध्यक्ष पदी त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम