क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी बाया कर्वे पुरस्कार देऊन डाॅ. सौ. शुभांगी गादेगावकर यांचा सन्मान

भाईदर : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या अभिनव विद्यामंदिर, गोडदेव, भाईंदर (पू), हिंदी माध्यम, प्राथमिक विभाग या शाळेत सहाय्यक शिक्षिकेच्या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर यांची एकूण ६ पुस्तके कविता, कादंबरी व बालसाहित्य या प्रकारात प्रकाशित आहेत. जवळपास १५ लेख विविध वर्तमानपत्रातून प्रकाशित आहेत. अनेक गीतांचे लेखन केले आहे. समाजप्रबोधन हा त्यांचा ध्यास.अनेक दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा, कविता, नाटिका प्रकाशित आहेत त्यांच्या साहित्यिक कार्याची योग्य दखल घेऊन कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल ॲवॉर्ड कोल्हापूरला देण्यात आला.कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडेल देऊन गौरविण्यात आले. इतकेच नाही तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त .. दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, अहमदनगर येथे ३ जानेवारीला पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन भरविण्यात आले. महाराष्ट्रातून ११ कर्तृत्ववान महिलांची निवड सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून  करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळेताई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल मीनाताई जगधने उपस्थित होत्या. बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार त्यांच्या हस्ते बाया कर्वे  पुरस्कार देऊन डाॅ. सौ. शुभांगी गादेगावकर यांचा सन्मान करण्यात आला  त्यांच्या पुढील सामाजिक, साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.



संबंधित पोस्ट