राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे "महिला कौशल्य विकास व उद्योजगता विकास कार्यशाळा आणि हळदी कुंकू समारंभ" या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील लोकनगरी संकुलातील गार्डन या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्षा पूनम विनोद शेलार व वॉर्ड क्रं. ५७ च्या समाजसेविका अश्विनी सचिन पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमात सुमारे अडीच हजारापेक्षा अधिक महिलांना हळदीकुंकू निमित्ताने भेटवस्तू देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, मायताई कटारिया, ठाणे जिल्हा शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी,  आदिती सारंगधर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, महिला प्रदेश सरचिटणीस प्रिसीला डिसिल्वा, समाजसेविका आशा पाटील,  यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून नगरपरिषदेवर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता आणु आम्ही मनकी बात सांगत  नसून जनकी बात करत असतो त्यामुळे  जनता येणाऱ्या  निवडणुकीत राष्ट्रवादी ला विजयी करतील. त्याच प्रमाणे हळदी कुंकू समारंभात यापुढे ज्या विधवा महिला आहेत त्यानांही मान द्यावा असे ही  यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट