घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला रबाळे पोलिसांनी केली अटक ! आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत !

नवी मुंबई -रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला रबाले पोलिसांनी जेरबंद केले आहे या चोरट्याचे नाव नूरआलम 

जियाउल शेख उर्फ नूर आलम पंजाब शेख वय (२५) धंदा बिगारी काम राहणार सेक्टर १९ कोपरखैरणे नवी मुंबई मुळगाव मालदा पश्चिम बंगाल या आरोपीला रबाले पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलेली आहे. या आरोपीकडून १० तोळे सोन्याचे दागिने चांदीचे ४०० ग्राम दागिने, व गुन्हा करताना वापरलेली लोखंडी छन्नी वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन वेगवेगळ्या देवाच्या ५  मुर्त्या असा एकूण ८ लाख ५० रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल रबाले पोलिसांनी हस्तगत केला आहे 

तक्रारदार गौरव अशोक कापडणीस वय वर्ष (३२) धंदा नोकरी राहणार गोठवली गाव नवी मुंबई हे आपल्या पत्नीसह आपल्या घराचे दरवाजा कुलूप लावून भाजी मार्केटमध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने आपला घराचा दरवाजा खोलून चोरी केल्याचे गौरव कापडणीस यांच्या लक्षात आले त्याचप्रमाणे सह फिर्यादी रुपेश नथुराम पंडित व महादेव एकनाथ   उकाडे यांच्या घराचे देखील दरवाजाचे कडी कोयंडे उचकाटुन अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते या तक्रारदारांनी  रबाले पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली होती या तक्रारीची गंभीर दखल रबाले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी तात्काळ घेऊन या आरोपींच्या मुस्क्या आवळण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्ह्या प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी विविध सीसीटीव्ही फुटेज चेक करून गोपनीय बातमीदाराच्या आधारे आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे सदरचा आरोपी पश्चिम बंगाल मालदा या ठिकाणी पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून या आरोपीवर  बोरिवली, बांद्रा, डोंबिवली विष्णूनगर,या पोलीस स्टेशनच्या  हद्दीमध्ये  गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे तसेच कल्याण न्यायालयाने या आरोपीला चार महिन्याची शिक्षा देखील दिलेली होती या आरोपीने  ती शिक्षा  उपभोगली असल्याचे समोर आले आहे. यात पाहिजे असलेला दुसरा आरोपी नस्तर पूर्ण नाव माहिती नाही हा फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत 

दरम्यान : सदरची कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करा अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या त्या सूचनेनुसार रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश थिटे, पोलीस निरीक्षक ब्राह्मानंद नाईकवाडी (प्रशासन) यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवळा अशा प्रकारच्या सूचना गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात, यांना केल्या होत्या त्यानुसार  दयानंद वनवे, प्रसाद वांगणकर, निलेश भोसले, गणेश वीर, दर्शना कटके, मयूर सोनवणे, यादवराव घुले, यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवलेले आहे अधिक तपास रबाले पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत

संबंधित पोस्ट