एक चोर तर दुसरा भिकार चोर' ! सहाय्यक अभियंता मराठे आणि दुय्यम अभियंता साखरकर यांची प्रचिती नेहमी निराळीच
रंग बदलण्यात सरड्याला मागे टाकणारे अधिकारी मुंबई महापालिकेतच! विकासकांचे तळवे चाटून चमचेगिरी करण्यात माहीर.
- by Reporter
- Jun 17, 2024
- 374 views
दुय्यम अभियंता विशाल साखरकर यांनी बांधकाम व्यावसायिकांना पोसण्याचा घेतलाय ठेका! सध्या बाकी दलालांपेक्षा ह्या रावणाला जास्तीचा भाव.
मुंबई- दक्षिण मुंबईत मसजिद बंदर डोगरी मोहम्मद अल्ली रोड अनधिकृत बांधकामाचा बोल-बाला अभियंतेचा मुह है काला !
१३१ झकेरिया मस्जिद स्ट्रीट,३० नाखोदा स्ट्रीट,५२/५४ व्ही व्ही चंदन स्ट्रीट,६ रघुनाथ महाराज स्ट्रीट, ६ खडक स्ट्रीट तोडक कारवाई रोखण्यासाठी विकासकांची धरपड! एका दुक्याच निलंबन झाले तरी बेहत्तर पण, लाच घेणारचं.सहाय्यक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांना अनधिकृत बांधकाम म्हटलं की, त्यांची होणारी चिडचिड ही सहाय्यक अभियंता मराठे अधिकाऱ्यांचा नाकारतेपणा सांगून जातो! तरी सुद्धा निलंबनाची कारवाई का नाही.
महापालिका बी विभागाचे सहाय्यक आयुक्त चंदनशिवे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे कळले आहे. सहाय्यक आयुक्तांना याबाबत विचारलं असता त्यांना याबाबत माहिती नाही असे सांगण्यात येते.पण याचा अर्थ असा की आयुक्तांपासून भरपुर काही लपवले जात आहे.आयुक्तांनपर्यत काही विषय अधिकारी पोहचू देत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.ही अशी एक बाजू मांडली जाऊ शकते पण इतक्या जबाबदार पदावर काम करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना थोडीही भनक नसणे हे अशक्य आहे.जनता सहाय्यक आयुक्तांना दोषी समजणे स्वाभाविक आहे. सहाय्यक आयुक्तच दिखावा करून सहाय्यक अभियंत्याला मार्गस्थ तर लावत नसतील अशी जनमानसात शंका आहे.भरमसाठ अनधिकृत बांधकामे आणि त्यामुळे महापालिकेचा बुडणारा महसूल यामुळे सहाय्यक आयुक्तांचे मंत्रालयापर्यत बदनामीचे ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत प्रशासकीय यंत्रणा सहाय्यक आयुक्तांच्या पूर्ण पणे हातात असूनसुद्धा सहाय्यक अभियंता मराठे दुय्यम अभियंता साखरकर सहाय्यक आयुक्तांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटण्याचे कार्य करत आहेत.त्यामुळे सहाय्यक आयुक्तांनी अकार्यक्षम अधिकाऱ्यांना घरी बसवायला हवे.
१३१ झकेरिया मस्जिद स्ट्रीट सोरटीया समाजाची इमारत येथील अनधिकृत बांधकाम आज ही जसेच्या तसे आहे.खोटी आश्वासने आणि बहानेबाजी करून करून सहाय्यक अभियंता मराठे दुय्यम अभियंता साखरकर, गणेश सानप यांनी अक्षरशः सहाय्यक आयुक्तांना वेड्यात काढले आहे. महापालिका बी विभागातील कामगार वरील ठिकाणी पोहचला पण कारवाई केली फक्त स्लॅबला होल मारण्या पूर्ती इमारत आहे तशीच उभी आहे सहाय्यक अभियंता मराठे याने पुन्हा कारवाई होणार नाही यासाठी विकासाकाकडे १० लाख मागितले असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.शिवाय सहाय्यक आयुक्तांना रक्कम पोहचवण्यासाठी अजून रोकड लागणार असल्याची माहिती दुय्यम अभियंता सानप बांधकाम विकासकाला देत आहे. दुय्यम अभियंता विशाल साखरकर हा एक नंबरचा दलाल असून मोठा सेटींगबाज असल्याच्या तक्रारी माध्यमातून समजत आहेत. सहाय्यक आयुक्तांची परवाह न करता स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याची नियत असणाऱ्या अश्या अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.
रिपोर्टर