कायदेशीर त्रुटी न राहता आरोपीस कठोर शिक्षा मिळावी या संदर्भात खबरदारीचे पालकमंत्री आदिती तटकरे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश

बोरघर/माणगांव (विश्वास गायकवाड) :  पनवेल येथील इंडिया बुल्स मधील कोविड-१९ विलगीकरण कक्षात काल (दि.१७ जुलै राेजी) एका महिलेवर अतिप्रसंगाची दुर्दैवी घटना घडली होती.
     
या घटनेतील संबंधित आरोपीची कसून चौकशी करावी, तपास प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी तपास अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि संबंधित आरोपीस जबर शिक्षा मिळावी, यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पोलीस विभागाला आणि प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
       
या घटनेतील आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर गु.र.नं.१०१/२०२०, भादंवि कलम ३७६ व ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    
 मात्र हा आरोपी संशयित करोनाबाधित असल्याने त्यास कोविड सेंटर मध्येच पाेलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्या आराेपीचा  कोविड चाचणी अहवाल प्रतिक्षेत असून ताे प्राप्त झाल्याबरोबर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट