कसोटी: टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव; मालिकेत १-० आघाडी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने यजमानांना पहिल्या टेस्ट सामन्यात ३१  धावांनी पराभूत केले. तब्बल ११  वर्षांनंतर प्रथमच कांगारूंच्या भूमीवर भारताने कसोटी सामना जिंकला. तसेच ४ कसोटी सामन्यांच्या सिरीजमध्ये भारतीय संघाने १.०  अशी आघाडी घेतली. टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवशी टीमने ही मजल मारली. अॅडलेड येथे सुरू असलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला २५० धावांत गुंडाळले होते. त्यामुळे टीम इंडिया ही कसोटी गमावते की काय? असं वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २३५ धावांवर बाद करून सामन्यात १५ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ३०७ धावा करत सामन्यात कमबॅक केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३२३ धावांचं आव्हान मिळालं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक उडाली. भारतीय गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाने अक्षरश: नांगी टाकली.

पहिल्या डावात ३ बळी घेणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावातही ३ बळी घेतले. तर बुमराह आणि मोहम्मद शमीनेही ३ बळी घेत छान साथ दिली. तर इशांत शर्माने एक गडी बाद केला. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने मार्कस हॅरिस (२६), उस्मान ख्वाजा (८) , पीटर हँड्सकॉम्ब (१४)ला बाद केलं. पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. ट्राविस हेड (१४) बाद झाल्यानंतर आधी जीवदान मिळालेला एरॉन फिंचही ११ धावांवर खेळत असताना रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत करवी झेलबाद झाला. त्यानंतर मैदानावर तळ ठोकून असलेली शॉन मार्श आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांची जोडी फोडण्यात जसप्रीत बुमराहला यश मिळालं. मार्श ६० धावांवर बाद झाला. मार्श आणि पेन जोडीने सहाव्या गड्यांसाठी ४१ धावा ठोकल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद १५६ अशी होती. त्यानंतर मैदानात जम बसवून असलेला पेनही लवकर बाद झाला. तो ४१ धावांवर बाद झाला. पंतच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराह करवी तो झेलबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७ बाद १८७ अशी झाली. मिचेल स्टार्कही २८ धावांवर बाद झाला.

स्कोअरबोर्ड : भारत २५० आणि ३०७ (राहुल ४४, चेतेश्वर पुजारा ७१, विराट कोहली ३४, अजिंक्य रहाणे ७०, पंत २८, लायन १२२-६, स्टार्क ४०-३) वि. ऑस्ट्रेलिया २३५ आणि ४ बाद १०४ (हॅरिस २६, मार्श ६०, हँड्सकॉम्ब १४, उस्मान ख्वाजा ८, ट्राविस हेड १४,फिंच ११, शॉन मार्श ६०, पेन ४१, मिचेल स्टार्कही २८, पॅट कमिन्स २८)

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट