आलोकनाथ यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
#MeToo अभिनेता अलोकनाथ याच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं अलोकनाथच्या अडचणी वाढल्या आहेत.
- by Adarsh Maharashtra
- Nov 21, 2018
- 1847 views
मुंबईः चित्रपट निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथवर बलात्काराचा आरोप केला
होता. ओशिवरा पोलिस ठाण्यात तशी तक्रारही दाखल करण्यात आली होती. तक्रारीची
शाहनिशा केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं
पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. अखेर पोलिसांनी मंगळवारी रात्री
त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त मनोज
शर्मा यांनी ही माहिती दिली. आलोकनाथ यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
#MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढं आलं होतं. २५ ऑक्टोबरला
आलोकनाथ यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना दिलासा मिळाला
नाही. अभिनेत्री संध्या मृदूल आणि दीपिका आमीन यांनीही आलोकनाथ यांच्यासोबत
आलेले वाईट अनुभव मीडियासमोर आणले होते.
बॉलिवूडमध्ये 'मीटू'ची लाट आल्यानंतर लैंगिक शोषणाचे सर्वाधिक आरोप झालेला
अभिनेता अलोकनाथ याच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं अलोकनाथच्या अडचणी वाढल्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम