राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2018
- 2467 views
मुंबई: दिवंगत नेते प्रमोद महाजन, यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. २५ वर्षीय कझाकिस्तानी प्रेयसी नात्याला लिनासोबत राहुलने लग्नगाठ बांधली आहे. मलबार हिल परिसरात या दोघांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. काही मोजकेच लोक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
राहुलचे हे तिसरे लग्न असून राहुल महाजनने याआधी वैमानिक श्वेता सिंग सोबत लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर राहुलने ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून डिंपी गांगुलीशी लग्न केले. डिंपीने लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार केली होती. दोघांचा लग्नानंतर पाच वर्षांत घटस्फोट झाला. डिंपीने राहुलपासून विभक्त झाल्यानंतर दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय याच्याशी विवाह केला.
राहुलचे नाव २०१६ मध्ये मॉडेल अमृता मानेसोबत जोडले गेले. राहुल आणि अमृता एकमेकांशी लग्न करणार असेही म्हटले जात होते. पण राहुलने आता कझाकिस्तानी मॉडेलशी लग्न केले आहे. मला दोन लग्न अपयशी झाल्यानंतर तिसऱ्या लग्नाबद्दल कोणालाही सांगायचे नव्हते, म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता छोटेखानी विवाहसोहळा आटोपला अशी माहिती राहुलने दिली. राहुल आणि नात्याला गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम