जगभरात कोरोनामुळे प्रत्येक १५ सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे
- by Adarsh Maharashtra
- Aug 06, 2020
- 950 views
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट :-भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्र (४,६८,२६५), तामिळनाडू (२,७३०००), आंध्र प्रदेश (१,७६,३३३), कर्नाटक (१,५००००) आणि दिल्ली (१,४०,२३२) या पाच राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. करोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार आतापर्यत १२ लाख ८२ हजार २१५ जणा करोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर कायम आहे. सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे की, प्रत्येक १५ सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७ लाख झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४९ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, १ लाख ६० हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या २ आठवड्यात जगभरातील आकडे वारीतून असे समोर आले आहे की, २४ तासांत ५९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक तासाला २४७ आणि प्रत्ये १५ सेकंदात एकाचा मृत्यू होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम