भारताचा कांगारूंवर ६ गडी राखून विजय; धोनी-केदार विजयाचे शिल्पकार
५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी
- by Adarsh Maharashtra
- Mar 02, 2019
- 1702 views
केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं २३७ धावांचं आव्हान भारताने केदार जाधव आणि धोनीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. २३७ धावांचा पाठलाग करत असताना भारताच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली होती. सलामीवीर शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी-केदार जाधव यांच्यात झालेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने सामन्यात विजय संपादन केला. केदार जाधवने नाबाद ८१ तर धोनीने नाबाद ५९ धावांची खेळी केली.
त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात 236 धावांपर्यंत मजल मारु शकला. पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर नियंत्रण ठेवत धावसंख्या वाढली जाणार नाही याची काळजी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच भोपळाही न फोडता जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला.
यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि उस्मान ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तग धरत संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारीही झाली. मात्र विराट कोहलीने केदार जाधवच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर, केदारने स्टॉयनिसला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली. दरम्यान उस्मान ख्वाजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं खरं, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात तो देखील कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विजय शंकरकडे झेल देत माघारी परतला.
यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. ग्लेन मॅक्सवेलने ४० धावांची खेळी करत या मध्ये मोलाचं योगदान बजावलं. मात्र शमी आणि कुलदीप यादवने मधल्या फळीतल्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधी दिली नाही. अखेरीस ५० षटकात कांगारुंचा संघ धावांपर्यंत २३६ पोहचला. भारताकडून कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना केदार जाधवने १ बळी घेत चांगली साथ दिली.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम