‘या’ मराठमोठ्या अभिनेत्रीने लिहिले ‘थप्पड’मधील दमदार संवाद

चित्रपटासोबतच त्यातील मनाला भिडणाऱ्या संवादाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

थप्पड, बस इतनी सी बात? या संवादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या चित्रपटात यांसारखे बरेच दमदार संवाद आहेत. चित्रपटासोबतच त्यातील मनाला भिडणाऱ्या संवादाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यात अनुभव सिन्हा यांच्यासोबत एका मराठमोठ्या अभिनेत्रीचा मोठा वाटा आहे. ही अभिनेत्री आहे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत तिने ‘थप्पड’चं कथानक लिहिलं आहे.

मृण्मयी लागू हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा सर्वच आघाड्यांवर तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ‘थप्पड’ची कहाणी विचार करायला प्रवृत्त करणारी असून सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक होत आहे.

चित्रपटात तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आज़मी आणि राम कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांच्याद्वारे निर्मित आणि तापसी पन्नूद्वारा अभिनीत हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट