मलायका अर्जुन कपूरचा विवाहसोहळा असेल असा...

अर्जुन कपूर आणि मलायका लग्नबंधनात कधी अडकणार याचीच चाहत्यांना प्रतीक्षा

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या सोशल मीडिया अकाऊंटची चर्चा कायमच कलाविश्वात पाहायला मिळते. सौंदर्य आणि मादकतेमुळे मलायकाच्या अदांनी अनेकजण घायाळ झाले. अशी ही सौंदर्यवती, अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच च़ढ-उतारांचा सामना केल्यानंतर आता एका नात्यात स्थिरावली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन कपूर आणि मलायका यांचं रिलेशनशिप आता एका नव्या वळणावर जाण्याच्या तयारीत आहे. ते लग्नगाठ केव्हा बांधणार याची चाहत्यांनाही उत्सुकता लागलेली आहे. खुद्द मलायका आणि अर्जुन या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी निवडक प्रसंगी गोपनीयता पाळलेली असली तरीही, स्वप्नवत विवाहसोहळा नेमका असावा तरी कसा हे मात्र मलायकाने दिलखुलासपणे सांगितलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या चॅट शोमध्ये म्हणजेच 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमात मलायकाने तिचा दिमाखदार विवाहसोहळा नेमका कसा असेल याचं चित्र स्पष्ट केल्याचं म्हटलं जात आहे. 'लग्नसोहळ्यामध्य पांढऱ्या रंगाची थीम असून पाश्चिमात्य पद्धतीने तो पार पडावा असं मला वाटतं. मला ब्राइड्समेड ही संकल्पनासुद्धा आवडते. माझ्या ब्राइड्समेड या माझ्या अतिशय जवळच्या मैत्रीणी असतील...', असं मलायकाने सांगितल्याचं म्हटलं जात आहे.

वाहबीज मेहता, ही आपली अतिशय जिवलग मैत्रीण आपली बेस्ट वुमन असेल असंही मलायका म्हणाली. तिचा हा वेडिंग प्लॅन पाहता आता येत्या काळात अर्जुन आणि तिच्या घरी लगीनघाई पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. 
काही दिवसांपूर्वीच ४६वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मलायकाने कायमच तिच्या करिअरला प्राधान्य दिलं आहे. यामध्ये तिने खासगी आयुष्याच्या बाबतीतही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याला प्राधान्य दिलं आहे.


संबंधित पोस्ट