कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे व पेय जल योजनेचे उद्घाटन!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील विविध रस्त्यांसह तालुक्यांतील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ठाकुरवाडींना मुबलक पाण्याची सोय व्हावी याकरता पेय जल योजनांचे उद्घाटन नुकताच कर्जतचे आमदार मेहंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे किरवली परीसरासह तालुक्यांतील विविध भागात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तसेच तालुक्यांतील अनेक रस्त्यांचेही उद्घाटन कर्जतचे आमदार थोरवे यांचा हस्ते करण्यात आले आहे.


कर्जत तालुक्यांतील सावरगाव ठाकुरवाडी, किरवली ठाकूरवाडी येथे पेय जल योजनेचं उद्धघटण करण्यात आले आहे. भारत देश स्वतंत्र झाल्या पासून आज पर्यंत ह्या वाड्यांना पाण्याची सोय नव्हती, मात्र कर्जतचे कार्यशील आमदार महेंद्रशेठ थोरवे याच्या प्रयत्नाने ह्या वड्यांना पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे येथिल नागरीकांनी आमदार थोरवे यांचे आभार मानले आहेत.  तसेच कर्जत तालुक्यांतील मौजे कुंडलज ते भातगाव कडे जाणारा २३ लक्ष निधीचा रस्ता, मौजे लाडीवली फाटा ते लाडीवली गावाकडे जाणारा १७.५० लक्ष निधीचा रस्ता आणि मौजे भाळीवडी येथिल गावाकडे जाणारा १२.९९ लक्ष निधीचा रस्त्याचे उद्घाटनही यावेळी आमदारांचा हस्ते करण्यात आले आहे, यावेळी आमदार यांच्यासंह कर्जतचे सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान किरवली येथिल पेय जल योजनेचा उद्घाटनाप्रसंगी व कर्जतचा या विविध रस्त्यांचा उद्घाटन प्रसंगी कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांसह कर्जतचे तालुका प्रमुख उत्तमशेठ कोळंबे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप ठाकरे, किरवली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सांबरी, सदस्य बबन गायकर, बिपीन बडेकर, युवीसेना विधानसभा अधिकारी संदिप बडेकर, पप्पू सालोखे यासंह अनेक सेनेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह सेनेचा महीलापदाधिकार येथ उपस्थितीत राहिल्या होत्या.





रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट