अन्यायग्रस्त महिलेची आमदारांकडून विचारपुस हलगर्जीपणा करणा-या डॉक्टरावर कारवाई .

 उल्हासनगर / प्रतिनिधी : शासकीय  मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे एका महिलेवर घरीच बाळंत होण्याची वेळ आली.नंतर तिला दवाखान्यात दाखल करुन घेतले.या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ विधानसभा आमदार डाँ. बालाजी किणीकर यांनी दवाखान्यात जाऊन अन्यायग्रस्त महिलेची भेट घेऊन विचारपुस केली.

  उल्हासनगर- ३ येथील मध्यवर्ती  रुग्णालयाने प्रसूतीकरिता आलेल्या गर्भवती महिला सौ.रुबिना शेख यांना दाखल करून घेण्याऐवजी दोन वेळा घरी पाठवले व त्यामुळे घरीच बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेची सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली.मध्यवर्ती  रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेल्या निष्काळजीपणा लक्षात घेत पालकमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवारी आमदार डॉ.  बालाजी किणीकर यांनी शिवसेना शहरप्रमुख श्री.राजेंद्र चौधरी यांच्या सोबत शासकीय रुग्णालयाला भेट देत आई आणि बाळाची विचारपूस केली. आई आणि बाळ सुखरूप असून निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कडक कारवाई करण्याच्या सूचना रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.सुधाकर शिंदे यांना दिल्या. तसेच हे रुग्णालय गरीब गरजु साठी आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर ततडीनं ईलाज करण्यात यावा ,यापुढे असले प्रकार खपवुन घेतले जाणार नाही.पत्रकार रामेश्वर गवई यांच्या  दिवंगत क न्या प्रणाली वर उपचार करण्यास दिरंगाई करणा-या डाँक्टरांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे रुबिना शेख ज्या परीसरात राहाते.तो भाग उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात येतो.याक्षेत्रात भाजपाचे आमदार कुमार आयलानी आहेत याघटनेला आज पाच दिवस झाले.परंतु आमदार आयलानी यांना या अन्यायग्रस्त महिलेला भेटायला सवड नसल्यानं त्यांच्या अशा वागण्यामुळे सम्राट अशोकनगर मधिल कार्यकर्ते नाराज आहेत.

संबंधित पोस्ट