
ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना चेंबूर पोलिसांनी केली अटक!
- by Reporter
- Jul 24, 2020
- 427 views
चेंबूर (जीवन तांबे) : गॅस कटरच्या सहाय्याने ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. जाहिद मुनेजात वय २४ व एका अल्पवयीन आरोपीला नागपाडा येथून अटक करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी या आरोपींनी चेंबूरच्या सिंधी कॅम्प येथील एका ज्वेलर्स चे दुकान फोडून दुकानातील सोने लंपास केले होते. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांची मदत घेतली. यानंतर दोघांना नागपाडा येथून ताब्यात घेतले. चेंबूर पोलीस ठाण्यात या दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून पोलिसांनी जवळपास १ लाख ८० हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. या घटनेत सामील असलेल्या अजून काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
रिपोर्टर